कोल्हापूर : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ( former Minister Hasan Mushrif in Kolhapur ) आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा त्यांनी यापूर्वी दावा केला होता. सोमैय्या यांनी म्हटले होते, की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून ( kirit somaiya allegation on Hasan Mushrif ) येते.
विशिष्ट जातीच्या राजकारण्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू- हसन मुश्रीफ दोन वर्षांपूर्वीसुद्धा आमच्या घरासह नातेवाईक आणि कारखान्यावर एकाच वेळी छापा पडला आहे. त्यावेळी तापस यंत्रणांना सहकार्य करत सर्व माहिती सादर केली आहे. मात्र आज पुन्हा एकदा घरासह, कारखाना आणि नातेवाईकांच्या घरांवर सुद्धा छापा पडला आहे. त्यामुळे तो आता कशासाठी माहिती नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनी शांत राहून कागल बंदचा निर्णय मागे घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे. तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. विशिष्ट जातीच्या राजकारण्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे. आधी नवाब मलिक आता मी आणि अस्लम शेख यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असे बोलले जाते आहे. हे निषेधार्ह आहे असेही ते म्हणाले आहे. यापूर्वीच्या कारवाईत काहीही सापडले नसून आता सुद्धा काहीही सापडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नावेद यांची चौकशी करण्याची मागणी : सर्व कागदपत्रे ईडी आणि प्राप्तीकर विभागाला दिल्याचे सोमेय्या यांनी सांगितले. मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषेदत केली होती. आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. ( Minister Hasan Mushrif in Kolhapur )
काय म्हणाले होते किरीट सोमैय्या : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांनी आत्तापर्यंत आघाडीतील एकूण 11 मंत्री अन् नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते, की ठाकरे-पवार यांची चलाखी आहे. मात्र ही चलाखी आत्ता चालणार नाही. 1,500 कोटींचे ग्रामविकास मंत्रालयाचे कॉन्ट्रॅक्ट हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिले आहे. त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. मुश्रीफांवर ग्रामपंचायत कंत्राटात 1500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची त्यांनी तक्रार दाखल केली आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या डोक्यातून नवीन कल्पना आणली आणि राज्यभरासाठी एका कंपनीला ठेका दिला गेला. ग्रामपंचायतीने वर्षाला 50 हजार रुपये दयायचे. जिल्हा परिषदेने 2 लाख द्यायचे. 28 हजार ग्रामपंचायतीचे 1500 कोटी दरवर्षी हसन मुश्रीफ यांच्या जावयाला मिळणार आणि ते कॉन्ट्रॅक्ट 10 वर्षासाठी आहे.