कोल्हापूर Shivkalin Shastra Pujan : नवरात्रौत्सवातील (Navratri utsav ) महत्त्वाचा दिवस म्हणजे खंडेनवमी. (khandenavami) या तिथीला शस्त्रास्त्रांची पूजा करण्यात येत असते.कोल्हापूरला कला आणि शस्त्रास्त्रांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. कोल्हापुरातील प्रत्येक पेठापेठांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळ शिकवणारे अनेक आखाडे आहेत आणि आखाड्यांमध्ये शिवकालीन युद्ध कला शिकवली जाते. खंडेनवमी निमित्त या आखाड्यांकडून युद्ध कलेतील शस्त्रांची पूजा केली जातय.यासाठी सकाळ पासूनच या शस्त्रांची स्वच्छता करून आकर्षक मांडणी केली जातय.
मर्दानी आखाड्यातील शस्त्र : कोल्हापूर म्हणजे कलेची नगरी. कोल्हापूरातील मर्दानी खेळ हा राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या युद्ध केल्याच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ही कला आताच्या पिढीला समजावी यासाठी कोल्हापुरातील अनेक आखाडे प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून वापरण्यात आलेले अनेक शस्त्र हे आज नामशेष होत चालले आहेत. दानपट्टा, माडू, गुर्ज, अडकित्ते, बाजू बंद यासारखे शस्त्र कोल्हापुरातील या मर्दानी आखाड्यात आज ही आपल्याला पहायला मिळतात.
500 पेक्षा अधिक शस्त्र : कोल्हापूरतील मर्दानी खेळ शिकवणारे प्रशिक्षक संदीप लाड हेही कला जपणाऱ्या मधील एक उत्तम उदाहरण आहेत. कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात राहणाऱ्या संदीप लाड यांनी शस्त्र संग्रह जोपासला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ शस्त्रांचा समावेश आहे. विविध प्रकारची 500 पेक्षा अधिक शस्त्र त्यांच्याकडे आजही आहेत. यामध्ये तलवार, भाला, गुर्ज, माडू, विटा, पाना, पट्टा, जांबिया, गुप्ती, ढाल, कुकरी, अंकुश, धनुष्यबाण, मराठा धोप, अडकित्ता, शिरस्त्रान, जुनी कुलपे, छुपी शस्त्रे, कटियार, ससून तलवारी यांच्यासह अनेक शस्त्रांचा समावेश आहे. चाणक्य मर्दानी खेळ संस्कृती सेवा संघाच्या वतीनं ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो तरुणांना मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देतात. खंडेनवमीच्या निमित्तानं शस्त्राचे पूजन केलं जातय. पूजन झाल्यावरती हा शस्त्रास्त्रांचा ठेवा कोल्हापूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात येतोय.
शस्त्रांची पाहणीसाठी नागरिकांची गर्दी : वयाच्या तीन वर्षापासून मर्दानी खेळांचे धडे हे येथे शिकवले जातात. आत्तापर्यंत शेकडो जणांना त्यांनी शिवकालीन युद्ध कलेचे विविध प्रकार शिकवले आहेत. राजनंदिनीच्या हस्ते या शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आलं आहे. यावेळी या सर्व शस्त्रांना हळद-कुंकू, फुल वाहून आणि आरती ओवाळून पूजन केलं जात. खंडेनवमीनिमित्त पूजन केलेल्या या शिवकलीन विविध शस्त्रांची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील अनेक नागरिक याला भेट देत आहेत.
हेही वाचा -