ETV Bharat / state

इम्पॅक्ट : शिरढोण पुलाला धोका वाढल्याने जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर, पाहा व्हिडिओ...

शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने पाण्यातील जलपर्णी वर आली असून पुलाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार अपर्णा मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ जलपर्णी काढण्याचे आदेश दिले आहेत.

शिरढोण पूल ईटीव्ही भारत वृत्त
Shirdhon bridge danger
author img

By

Published : Jun 19, 2021, 4:55 PM IST

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने पाण्यातील जलपर्णी वर आली असून पुलाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार अपर्णा मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ जलपर्णी काढण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय जवळपास एक किलोमीटरवर पसरलेल्या जलपर्णीच्या दाबामुळे पुलाला धोका असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या संरक्षक काठड्याच्या पाईपसुद्धा कापल्या जात आहेत.

शिरढोण पुलाला तटलेली जलपर्णी

हेही वाचा - पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये समन्वय गरजेचा; यंदाही कोल्हापूर, सांगलीला महापुराची धास्ती

नदीतील पाण्याची पातळी जसजशी वाढत चालली आहे, तसतशी जलपर्णी वर येत असून आता तर पुलापेक्षाही जलपर्णीचा उंच ढिगारा दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पुलावरील वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे.

जलपर्णी काढणे हाच पर्याय, अन्यथा पुलाला धोका

दरम्यान, प्रदूषित पाण्यामुळे उन्हाळ्यात इचलकरंजी पासून शिरोळकडे पुढे आलेल्या पंचगंगा नदी पात्रात जलपर्णी व्यापली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात वाहत आलेली जलपर्णी पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलाला येऊन तटली आहे. पाण्याची पातळी जशी वाढेल, तशी जलपर्णी वर येत असून पुलाला दाब देत आहे. आता तर जलपर्णीची उंची पुलापेक्षाही वर गेली आहे. एकीकडे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढत चालली आहे, त्यातच जलपर्णीचा दबाव सुद्धा प्रचंड वाढत आहे. त्यामुळे, पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलानजिक असलेले दोन विद्युत पोलसुद्धा जलपर्णीच्या दाबाने पूर्णपणे वाकले आहेत. त्यामुळे, तात्काळ या पुलावरील वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

जलपर्णी काढण्याबाबत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा पंचगंगा नदी प्रदूषण आणि जलपर्णी काढण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आता मात्र परिस्थिती आणखीनच बिकट बनल्याने प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या असून जेसीबीच्या सहाय्याने नदीमध्ये पुलाला येऊन तटलेली जलपर्णी बाहेर काढायचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवाय पुलावर दबाव वाढू नये यासाठी संरक्षण काठड्याच्या लोखंडी पाईपसुद्धा कापल्या जात आहेत.

हेही वाचा - कोल्हापूरवासीयांना लवकरच पाइपलाइनचे पाणी मिळणार - हसन मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.