ETV Bharat / state

Drug Spraying by Drone : ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, पहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

शेतात आजही सर्व काम पारंपरिक पद्धतीनेच होतात. यातील बदल पाहिला तर ट्रॅक्टरने आता मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. (Drug spraying on crops by drone) जे बैलांच्या माध्यमातून होत होते. परंतु आता वाढत्या तंत्रज्ञानाच्या दिवसांता शेतीतील अनेक कामे तंत्राच्या साहाय्याने होत आहेत. (Drug Spraying by Drone) असाच एक प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यीतल कागल तालुक्यात करण्यात आला आहे. येथे ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली आहे.

ड्रोनद्वारे औषध फवारणी
ड्रोनद्वारे औषध फवारणी
author img

By

Published : Jan 16, 2022, 8:09 AM IST

Updated : Jan 16, 2022, 1:23 PM IST

कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण पारंपरिक शेती पध्दतीचाच अवलंब करताना पाहायला मिळतात. मात्र, याच पारंपरिक शेती पध्दतीला आता (Drug spraying on crops by drone) अधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण इथल्या कागल तालुक्यात पहिल्यांदाच शेतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत औषध फवारणी करण्यात आली आहे. (traditional farming method) हा अभिनव प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील (Drug Spraying by Drone) श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा वेळे तर वाचणार आहेच, त्याचबरोबर औषध, पैसे, पाणी आणि श्रमाचीही बचत होणार आहे. दरम्यान, याबाबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.

व्हिडिओ
11 हजार हेक्टर क्षेत्रावर ही औषध फवारणी ड्रोन द्वारे केली जाणार

महाराष्ट्रातील सर्वात सदन जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. परिणामी जिल्ह्यात मुबलक पाणी असते. (Modern technology in agriculture) त्यामुळे इथे नेहमीच विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतात. याच पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी इथला शेतकरी नेहमीच आपल्या शेतीत अत्याधुनिकतेची जोड देत विविध बदल करत आला आहे. (Chhatrapati Shahu Cooperative Sugar Factory) शेतकऱ्यांच्या याच शेतीमध्ये आता श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्याने ड्रोन द्वारे औषध फवारणी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जात आहे. शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्रात सोबतच गेटकेन अशा 11 हजार हेक्टर क्षेत्रावर ही औषध फवारणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. पारंपरिक औषध फवारणीने वाढ झालेल्या उसाला फवारणी करण्यास अडचण येते तर शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे ड्रोनद्वारे औषध फवारणी हा राज्यातील पहिला प्रयोग शाहू कारखान्यामार्फत राबवण्यात येतोय.

ड्रोनद्वारे औषध फवारणीचे फायदे काय आहेत यावर एक नजर

  • 1) ड्रोनमुळे आठ ते दहा मिनिटात एक एकर फवारणी होते तर पारंपरिक फवारणीमुळे चार ते पाच तास आपले वाचतात.
  • 2) ड्रोनमुळे एकरी 8 ते 10 लिटर पाण्याचा औषधा सहित वापर होतो तर पारंपरिक फवारणीममध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असतो.
  • 3. ड्रोनमुळे 30 ते 40 टक्के औषधामध्ये बचत होते तर पारंपरिक फवारणी मुळे औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे खर्चात वाढ होते.
  • 4. ड्रोनमुळे जमिनीची सुपीकता राखण्यास मदत होते तर पारंपारिक फवारणीमुळे अनियंत्रित फवारणीने जमीन व पर्यावरणाचा ऱ्हास होतो.

5. ड्रोनमुळे समांतर खोलवर व एक समान फवारणी होते तर पारंपारिक फवारणीने फवारणीची परिणामकारकता अतिशय कमी होते.

शाहू कारखाना आणि चातक इनोव्हेशनच्या माध्यमातून प्रयोग

श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि चातक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून औषध फवारणी ऊस पिकावर सुरू केली आहे. यामुळे वेळ, औषध, पैसे पाण्याची आणि श्रमाचीही बचत होते. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असल्याचेही चातक इनोव्हेशनचे एमडी सुभाष जमदाडे यांनी सांगितले आहे.

श्रमाची, वेळेची आणि पैशाचीही बचत; शेतकऱ्यांना दिलासा

औषध फवारणीसाठी विविध प्रयोग आजवर झाले आहेत. मात्र, जिल्ह्यात प्रथमच ड्रोन द्वारे औषध फवारणीचा प्रयोग झाला आहे. सध्या मजुरांची उपलब्धता नसल्याने फवारणीसाठी होणाऱ्या अडचणीवर ड्रोन द्वारे औषध फवारणी हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. परदेशात कृषी क्षेत्रात होणारा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आता कोल्हापूर जिल्ह्याच्या साखर पट्ट्यात होऊ लागला आहे. त्यामुळे नक्कीच इथल्या शेतकऱ्यांना याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

हेही वाचा - खजिनाच्या चाव्या चोरांच्या हातात... यशोमती ठाकूर यांच्याकडून भाजपाची पोलखोल

Last Updated : Jan 16, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.