ETV Bharat / state

आघाडीच्या बैठकीला सतेज पाटलांची दांडी; महाडिकांसोबत पॅचअप करण्यात जयंत पाटील अपयशी - nanti patil

राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैयक्तिक वादामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

author img

By

Published : Mar 24, 2019, 3:03 PM IST

कोल्हापूर -कोल्हापुरात होणाऱ्या काँग्रेस कमिटी बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापुरात तर आमदार सतेज पाटील सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील गटाची नाराजी दूर करायला येणारे जयंत पाटील आता कोणाशी चर्चा करणार याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेस कमिटी बैठक

राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैयक्तिक वादामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.कोल्हापुरात या आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ही शक्यताच ओळखूनच जयंत पाटील यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेऊन ते आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीला बोलावण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक या बैठकीला आले मात्र सतेज पाटील आणि त्यांच्या गटातील कार्यकर्ते मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत. सतेज पाटील यांच्याशी आज या वादाबाबत चर्चा होणारच असे म्हटले जात आहे. मात्र, सतेज पाटीलच सताऱ्यामध्ये असल्याने जयंत पाटील त्यांची कुठे भेट घेणार की, मोकळ्या हातानेच परत जाणार?याचीच चर्चा आता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे.

आघाडीच्या बैठकीत सतेज पाटलांची अनुपस्थिती ; बंटी - मुन्ना यांचे पॅचअप करायला आलेले जयंत पाटील जाणार मोकळ्या हाताने ?

कोल्हापूर -  कोल्हापुरात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या काँग्रेस कमिटीतील बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार नाहीत. जयंत पाटील कोल्हापुरात तर आमदार सतेज पाटील सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील गटाची नाराजी दूर करायला येणारे जयंत पाटील आता कोणाशी चर्चा करणार याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैयक्तिक वादामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झालीय. 
     कोल्हापुरात या आघाडीत झालेल्या या बिघाडीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ही शक्यताच ओळखूनच जयंत पाटील यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेऊन ते आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीला बोलावण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक या बैठकीला आले मात्र सतेज पाटील आणि त्यांच्या गटातील कार्यकर्ते मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत. सतेज पाटील यांच्याशी आज या वादाबाबत चर्चा होणारच असे म्हंटले जात आहे. मात्र सतेज पाटीलच सताऱ्यामध्ये असल्याने जयंत पाटील त्यांची कुठे भेट घेणार की, मोकळ्या हातानेच परत जाणार ?  याचीच चर्चा आता कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे. 

(Vis फाईल whtsapp वरून पाठवली आहे plzzz चेक)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.