ETV Bharat / state

'खड्डा दाखवा आणि बक्षीस जिंका'; कोल्हापूरात 'या' अनोख्या स्पर्धेचे आयोजन! - खड्ड्यांच्या फोटोंचे भव्य असे प्रदर्शन

कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडतर्फे (Sambhaji Brigade) एक जगावेगळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. (bad road competition in kolhapur). शहरातील खराब रस्त्यांना वैतागून शहरातील तसेच जिल्ह्यातील खराब रस्ते किंवा सर्वात मोठे खड्डे जो दाखवेल त्याला बक्षीस मिळणार आहे.

bad road competition in kolhapur
'खड्डा दाखवा आणि बक्षीस जिंका
author img

By

Published : Nov 3, 2022, 5:19 PM IST

कोल्हापूर: कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडतर्फे (Sambhaji Brigade) एक जगावेगळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. (bad road competition in kolhapur). शहरातील खराब रस्त्यांना वैतागून शहरातील तसेच जिल्ह्यातील खराब रस्ते किंवा सर्वात मोठे खड्डे जो दाखवेल त्याला बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याभरातल्या या खड्ड्यांच्या फोटोंचे भव्य असे प्रदर्शन सुद्धा भरवले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी निलेश सुतार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

bad road competition in kolhapur
'खड्डा दाखवा आणि बक्षीस जिंका

राज्य सरकारने रस्त्यांच्याबाबत ठोस निर्णय घ्यावा: निलेश सुतार म्हणाले, काही दिवसांपूर्वीच राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार बनले आहे. त्यांनी सुरत, गुवाहाटी आणि गोव्याचे दौरे केले आहेत. तिथले रस्ते त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे किमान त्या पाहिलेल्या सुविधांप्रमाणे आमच्या कोल्हापूरात तरी रस्ते करून द्यावे. हे सर्व आम्ही सरकारला आणि महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी करत असून, जर सरकारला हे खड्डे दिसत नसतील तर आम्ही फोटोंच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करू असे सुतार यांनी म्हटले आहे.

हे आहे बक्षीस: या स्पर्धेच्या पोस्टरचे शहरातील बिंदू चौक येथे संभाजी ब्रिगेडच्या इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. या पोस्टर वर बक्षिसांचे स्वरूप सुद्धा देण्यात आले आहे. सर्वात मोठा खड्डा दाखवेल त्याला गुवाहाटी नावाने प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय 3500 रुपये रोख रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. दुसरे बक्षीस सुरत नावाने देण्यात येणार आहे. त्यासाठी 2500 रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तिसरे बक्षीस गोवा नावाने दिले जाणार असून त्यासाठी 1500 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. आणखी 10 आकर्षक बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत. त्यासाठी 7038641001, 7385299393, 9764931775 या व्हाट्सअप क्रमांकावर फोटो आणि खड्याचे ठिकाण पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्यातून आलेल्या सर्व फोटोंचे एकत्रित भव्य प्रदर्शन भरवले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.