ETV Bharat / state

सतेज पाटलांना निमंत्रण देणार, यायचं की नाही त्यांचा निर्णय - धनंजय महाडिक

आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना आपण आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देणार आहोत. मात्र, यायचे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.

धनंजय महाडिक
author img

By

Published : Mar 30, 2019, 4:34 PM IST

कोल्हापूर - आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना आपण आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देणार आहोत. मात्र, यायचे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. आज कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या नेत्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

धनंजय महाडिक

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. परंतु, या वादाचा फटका खासदार महाडिक यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मी आघाडी धर्म पाळून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतेज पाटील यांना आमंत्रण देणार असल्याचे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे. येत्या २ तारखेला शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. ते कोल्हापुरात येऊन 'बंटी' आणि 'मुन्ना' यांच्यामध्ये समेट घडवणार का? याकडेच सगळ्याचे लक्ष लागले आहे.

Intro:कोल्हापूर - आमच्या आघाडीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांना उमेदवारी अर्ज भरताना निमंत्रण देणार आहे. पण त्यांनी यायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे असं वक्तव्य आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय. आज कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या नेत्यांचा मेळावा पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांनी हे वक्तव्य केलंय. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते.Body:कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात असेलेले वैर सर्वश्रुत आहे. पण या सर्वाचा फटका खासदार महाडिक यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मी आघाडी धर्म पाळून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतेज पाटील यांना आमंत्रण देण्यार असल्याचं खासदार महाडिक यांनी म्हंटलय. येत्या २ तारखेला शऱद पवार कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळं पवार कोल्हापुरात येऊन बंटी आणि मुन्ना यामध्ये समेट घडवणार का याकडंच सगळ्याचं लक्ष लागलंय.

बाईट - धनंजय महाडिक, खासदार, राष्ट्रवादी काँंग्रेसConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.