ETV Bharat / state

Deepak Kesarkar : कोल्हापूर जिल्ह्यासाठी 389 कोटींच्या प्रारुप विकास आराखड्यास मान्यता.. नियोजन समितीची बैठक - Kolhapur District Planning Development Committee

Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांनी प्रारुप आराखड्याला मान्यता दिली ( Deepak Kesarkar Approved Draft Plan ) आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक पार ( Kolhapur District Planning Development Committee ) पडली. मंजूर निधी योग्य कामासाठी वापरण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Approval  draft plan
प्रारुप आराखड्यास मान्यता
author img

By

Published : Dec 25, 2022, 1:28 PM IST

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सभेत 389 कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

कोल्हापूर : Deepak Kesarkar :सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेला निधी 31 मार्च 2023 अखेरपर्यंत 100 टक्के खर्च ( Kolhapur District Planning Development Committee ) करावा. संबंधित विभागांनी तात्काळ तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन मंजूर विकास कामावर हा निधी काटेकोरपणे खर्च करण्याचे नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत निधी व्यपगत होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले (Order To Utilize Sanctioned Funds For Work ) आहेत.

नियोजन समितीची बैठक : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदींची उपस्थिती ( Guardian Minister Deepak Kesarkar In Kolhapur ) होती.

सात दिवसात कामांचे प्रस्ताव नियोजन : पालकमंत्री केसरकर म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 चा 389 कोटीचा प्रारुप आराखडा तसेच अनुसूचित जाती उपायोजनेचा 116 कोटीच्या प्रारूप आराखड्यास समितीने मान्यता दिल्याचे ( Deepak Kesarkar Approved Draft Plan ) त्यांनी सांगितले. सन 2022-23 ची सर्वसाधारण योजना 425 कोटी व अनुसूचित जाती उपायोजना 116 कोटीचा मंजूर असलेला निधी 31 मार्च पर्यंत खर्च करावा. ज्या शासकीय यंत्रणांचा निधी खर्च होऊ शकत नाही अशा यंत्रणांनी सदरचा निधी तात्काळ नियोजन समितीला समर्पित करावा. जेणेकरून ज्या शासकीय यंत्रणा हा निधी खर्च करु शकतील त्यांना तो विकास कामासाठी देण्यात येईल. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी मंजूर असलेली विकास कामे त्वरित सुरु करावे. कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, पंचगंगा घाट परिसरात विकास कामे राबवणे, ओल्ड पॅलेस ते न्यू पॅलेस पर्यंतच्या रस्ता हेरिटेज स्ट्रीट म्हणून विकसित करणे व रंकाळा परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पुढील सात दिवसात कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाला सादर करावेत, असे निर्देश केसरकर यांनी यावेळी दिले आहेत.

तालीमींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी : कोल्हापूर शहराला मर्दानी खेळांची विशेष परंपरा आहे. या परंपरेतीलच एक खेळ म्हणजे कुस्ती. या कुस्त्यांचे प्रशिक्षण ज्या तालीमींमध्ये दिले जाते त्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. तरी या तालीमींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली व त्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाने त्वरित नियोजन समितीला सादर करावेत, असेही सांगितले.तर जिल्ह्यातील एक ही शाळा नादुरुस्त राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राजाराम कॉलेजसाठी वेगळा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच या ठिकाणी एक आदर्श शाळा निर्माण करण्याबाबत नागरिक व तज्ञ व्यक्ती यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले.

इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना : इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वीस कोटीची मागणी, कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे, नर्सेस भरती, लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, रस्ता दुरुस्तीची कामे, रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी, कोल्हापूर शहरात दोन-तीन अद्यावत उद्याने उभारणे, स्मशानभूमीचा प्रश्न, वाहतूक व्यवस्था व पर्यटनाच्या अनुषंगाने प्रश्न तसेच विविध विकासात्मक कामासाठी निधीची मागणी यावेळी लोकप्रतिनिधीं कडून करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.