कोल्हापूर - येत्या २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ ते १२ ची शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याकरिता पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करणे, शाळाचे निर्जतूकीकरण करणे आदी उपयायोजना करण्यात आल्या आहे. तर दुसऱ्या टप्यामध्ये ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणामध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
भविष्यात शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी काम करणार -
सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीला जाणार आहेत, तर अकरावीचे विद्यार्थी बारावीला जाणार आहेत. मुलांच्या एका वर्षाचे नुकसान होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भविष्यात त्यांना संकटाना सामोरे जायला लागू नये, यासाठी शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याचा प्रयत्न आहे. शाळा वाड्यावस्त्यांमध्ये गावांमध्ये पोहचल्या आहेत. व्हिजन २०२५ च्या माध्यमातून भविष्यात शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी काम करायचे आहे. आदर्श शाळा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, लागाणारा अभ्यासक्रम, मुल्यांकन या गोटी कराव्या लागतील. सोबतच मुलांना काय शिकवले पाहीजे, यासाठीचे प्रेझेंटेशन मुखयमंत्र्याना दाखविण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा- सोलापुरात कंटेनरने तिघांना चिरडले, पुण्याच्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती