ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष : कोरोनामुळे नागरी सेवा खोळंबल्या; 5 मिनिटांच्या कामाला लागतात 2 तास! - कोरोना नागरी सेवा परिणाम कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, तहसीलदार कार्यालय तसेच मुद्रांक आणि नोंदणी विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. मात्र, याच कार्यालयात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजी सुद्धा घेतली जात आहे. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांच्या कामासाठी 2 तास लागतात, असेही काही नागरिक सांगत आहेत.

corona impact on civil services kolhapur
कोरोनामुळे नागरी सेवांवर परिणाम
author img

By

Published : Sep 9, 2020, 3:30 PM IST

Updated : Sep 9, 2020, 5:15 PM IST

कोल्हापूर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाखांहून अधिक झाली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय कार्यालयांमध्ये विविध निर्बंध घातले जात आहेत. याचाच परिणाम नागरी सुविधांवर झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांची कामे खोळंबून पडली आहेत. तर, काहींच्या 5 मिनिटांच्या कामाला 2 तास लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

'ईटीव्ही भारत' विशेष : कोरोनामुळे नागरी सेवा खोळंबल्या; 5 मिनिटांच्या कामाला लागतात 2 तास!

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, तहसीलदार कार्यालय तसेच मुद्रांक आणि नोंदणी विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या नागरी सेवा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. मात्र, याच कार्यालयात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने काळजीसुद्धा घेतली जात आहे. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांच्या कामांसाठी 2 तास लागतात, असेही काही नागरिक सांगत आहेत. महापालिकेतील बांधकाम विभाग, घरफाळा विभागासह सर्वच ठिकाणी काटेकोरपणे कोरोनाबाबत काळजी घेतली जात आहे. त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि सर्वच तहसील कार्यालयातही काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून, जिल्हा परिषद, महापालिका आणि तहसील कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याचा रोजच्याच कामकाजामध्ये काही प्रमाणात अडथळा आला आहे. शहरात असणाऱ्या करवीर तहसील कार्यालयात तर नागरिकांना प्रवेशच नाकारण्यात आला आहे. केवळ एका खिडकीद्वारे नागरिकांची कामे पहिली जात आहेत. आजपर्यंत कार्यालयात रुग्ण आढळल्यामुळे कार्यालय बंद करण्यात आल्याचा किंव्हा सील करण्याची वेळसुद्धा काही कार्यालयांवर आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग काही दिवसांपूर्वी 3 ते 4 दिवसांसाठी सील करण्यात आला होता. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करुन सोडले जात होते. त्यानंतर आता कोल्हापूर महानगरपालिकाही पुढच्या 15 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. शिवाय जिल्हा परिषदेतही आता नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. या तीन घटना वगळता शक्यतो इतर ठिकाणी असे प्रसंग घडले नाहीत.

यामध्ये अनेकांची कामे खोळंबणार आहेत. अनेक जण जिल्हा परिषद आणि महापालिका कार्यालयांच्या बाहेर आतमध्ये प्रवेश मिळेल, या आशेवर ताटकळत उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, मनपात कोरोनाची लागण झालेले काही महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे -

  • जिल्हाधिकारी कार्यालय - भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह तब्बल 25 अधिकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण.
  • जिल्हापरिषद - अमन मित्तल, सीईओ झेडपी यांच्यासह जवळपास 25 ते 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, पंचायत समिती आणि इतर विभागातील कर्मचारी अधिकारी मिळून असे 130 हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • महानगरपालिका - रणजित चिले (मुख्य अग्निशमन अधिकारी), जयवंत पवार (मुख्य आरोग्य निरीक्षक) यांच्यासह दोन सहाय्यक आयुक्त तसेच अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • तर महापालिकेतील बांधकाम विभाग आणि वर्कशॉप विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.