कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज, अशी तुलना करणे काही गैर नाही, असे वादग्रस्त वक्तव्य इचलकरंजीचे माजी भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलं आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे आणि लेखक जयभगवान गोयल यांचे समर्थन करत गोयल यांच्या या पुस्तकाबद्दल आकांडतांडव होण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भारतीय जनता पक्ष्याच्या दिल्ली कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या सांस्कृतिक संमेलनात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकावरून काँग्रेस आणि शिवसेनेनं सडकून टीका केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच भाजपच्या माजी आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे.
हेही वाचा - शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचे श्राद्ध ; मराठी साहित्यिकांवरील बंदीचा केला निषेध
एकीकडे भाजप नेते या पुस्तकाची जबाबदारी झटकत असताना भाजपच्या माजी आमदाराकडून गोयल यांचे समर्थन करण्यात आले आहे. कोल्हापुरात आयोजित भाजप पदाधिकारी निवड कार्यक्रमप्रसंगी सुरेश हाळवणकर यांनी हे विधान केले आहे.