कोल्हापूर - जिल्ह्यात आज सकाळपासून आणखी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोल्हापुरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे दिलासादायक चित्र असले तरी दुसरीकडे आज आजरा तालुक्यातील आणखीन एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 659 वर गेली आहे, तर त्यातील एकूण 419 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 7 जणांचा कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज सकाळपासून एकूण 131 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उरलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
- आजअखेर तालुका, नगरपालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा- 63
भुदरगड- 67
चंदगड- 75
गडहिंग्लज- 69
गगनबावडा- 6
हातकणंगले- 6
कागल- 55
करवीर- 14
पन्हाळा- 25
राधानगरी- 63
शाहूवाडी- 169
शिरोळ- 7
नगरपरिषद क्षेत्र- 11
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21
असे एकूण 651 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 659 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 659 रुग्णांपैकी 419 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यात अद्याप 233 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.