ETV Bharat / state

कोल्हापूर : जप्त केलेली दारू कर्मचाऱ्यांनी ढोसली? सहा जणांना अटक तर एक फरार

पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली दारू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती अशी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे.

shahupuri police station
शाहुपूरी पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 24, 2021, 10:38 PM IST

कोल्हापूर - छापे व पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेली दारू ही तपासणीसाठी आल्यानंतर ती ढोसण्याचा प्रकार समोर आला आहे. ताराराणी चौकातील फॉरेन्सिक लॅबमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील सहा जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.

पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली दारू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती अशी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. विभागाकडे तपासणीला आणलेली दारू येथील कर्मचाऱ्यांनी चोरून त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला. न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक प्रदीप गुजर यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

लॉकडाऊन काळात घडला प्रकार -

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत जप्त केलेली दारू ही तपासणीकरिता कोल्हापुरात दारुबंदी विभागाच्या ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली जाते. अशा पद्धतीने विविध कारवाईत जप्त केल्यापैकी सुमारे ३१ हजार १७६ रुपये किमतीची दारू ही न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली होती. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने चोरून ती फस्त केल्याचे उघडकीस आले. लॉकडाउन काळात म्हणजे एप्रिल ते मे 2020 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांनी ही दारू फस्त केली, की बाहेर विक्री केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील संशयित अटक कर्मचारी -

  • वाहन चालक - वसंत भानूदास गौड (४७, रा. पिंजार गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा)
  • वरिष्ठ सहायक -अक्षयकुमार सखाराम मालेकर (३३, रा. न्यू शाहुपुरी, सुर्वे कॉलनी),
  • कंत्राटी कर्मचारी- मारुती अंबादास भोसले (३४, रा शाहुपुरी २ री गल्ली)
  • राहुल पांडुरंग चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप),
  • गणेश मारुती सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ),
  • विरुपक्ष रामू पाटील (२५, रा. विचारेमाळ, सदरबाजार)
  • तर लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९ रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा अद्याप गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.