ETV Bharat / state

कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो; मुख्यमंत्र्याची अंबाबाई चरणी प्रार्थना

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक साधन सामग्रीसह 14 बेडचा कोरोना वॉर्ड क्रोम क्लिनिकल रिसर्च ॲण्ड मेडिकल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रुपाने तयार करून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण केले.

cm uddhav thackeray inaugurate new Corona ward in kolhapur
कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो; मुख्यमंत्र्याची कोरोना वॉर्ड लोकार्पणप्रसंगी अंबाबाई चरणी प्रार्थना
author img

By

Published : Jun 20, 2020, 12:01 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. कोल्हापुरातही सीपीआरमध्ये सुसज्ज कोरोना वॉर्ड उपलब्ध झाला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र या आरोग्य सुविधा वापरण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. नागरिक आनंदी आणि निरोगी राहो. कोरोनाचे हे संकट समूळ नष्ट होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंबाबाई चरणी केली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक साधन सामग्रीसह 14 बेडचा कोरोना वॉर्ड क्रोम क्लिनिकल रिसर्च ॲण्ड मेडिकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रुपाने तयार करून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करीत आहोत. यासाठी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे. कोरोनाचे संकट कदाचित गंभीर झाल्यास आरोग्य सुविधा कमी पडू नये, यादृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मुंबईत तर, देशातील सर्वात मोठे कोव्हिड हॉस्पिटल उभे केले आहे. याबरोबरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातही आरोग्य सुविधा सक्षम आणि सुसज्ज केल्या जात आहेत.

कोरोना वॉर्ड लोकार्पण सोहळ्याचे दृश्य...

यापुढील काळात कोरोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरून शासन आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष आणि सजग आहे. कोरोनाच्या युद्धात प्रशासकीय यंत्रणा विशेषत:, आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. यापुढेही आरोग्यविषयक कामात कसूर होणार नाही. उलट कोरोना व्हायरस नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपणच माणसांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. कोल्हापुरातील सीपीआरमध्ये क्रोम रिसर्च ॲण्ड मेडिकल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुसज्ज कोरोना वॉर्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रोमचे कार्यकारी संचालक धनंजय लाड यांना मुख्यमंत्र्यांनी शासनाच्यावतीने धन्यवाद दिले.

या कार्यक्रमात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लढ्यात क्रोमच्यावतीने सीपीआरमध्ये सुसज्ज वॉर्ड उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. जगभरात कोरोनाचे थैमान घातले असताना, कोल्हापुरात मात्र प्रशासन आणि आरोग्य‍ विभागाने कोरोना नियंत्रणात ठेवण्यात केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रोमचे कार्यकारी संचालक डॉ. धनंजय लाड, हरिबा लाड, डॉ. महेंद्र बनसोडे, नितीन पाटील आदींची भाषणे झाली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी या वॉर्डविषयी सविस्तर माहिती दिली. या लोकार्पण सोहळ्यास आपत्ती व्यवस्थापनचे समन्वयक संजय शिंदे, सीपीआर व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - कोल्हापुरात खासगी सावकाराच्या घरावर छापा; घरातून महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त

हेही वाचा - पेल्यातील वादळ अखेर पेल्यातच थंडावले; स्वाभिमानीचे पदाधिकारी म्हणाले 'हम साथ साथ है'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.