कोल्हापूर - जिल्ह्यातील वस्त्रोद्योग, फौंड्री, चर्मोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून पोलंडमधील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सरकार नेहमीच प्रोत्साहन देईल. कोल्हापूर आणि पोलंडमधील भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रिझीदाज, पोलंडचे राजदूत डम बुरॉकोस्की व खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते.
हेही वाचा - गुजरातमध्ये जोरदार पाऊस.. नर्मदा धरणातील जलस्तर उच्चांकी पातळीवर
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रिझीदाज, यांनीदेखील दिल्लीप्रमाणे मुंबई किंवा पुणे ते वॉर्सो अशी थेट हवाई वाहतूक सुरू करण्याचा पॉलिश विमान सेवेचा मनोदय असल्याचे व्यक्त केले. खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने ही पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. यात कोल्हापुरातील उद्योजक सहभागी झाले होते.
हेही वाच - म्हैसूर दसरा उत्सवात पी. व्ही. सिंधू राहणार उपस्थित , कर्नाटक मुख्यमंत्र्याचे निमंत्रण
दुसऱ्या महायुद्धातील निर्वासीत पोलीश नागरिकांना कोल्हापूर येथे जो आश्रय मिळाला आणि येथील समाजात त्यांना जी आपलेपणाची वागणूक मिळाली त्याबद्दल उपपरराष्ट्रमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, येणाऱ्या काळात सांस्कृतिक आदानप्रदान तसेच व्यापार-उद्योग जास्तीत जास्त वाढवण्यासाठी पोलंड सरकार प्रयत्न करणार आहे. कोल्हापूर आणि पोलंडमधील व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी एक फोरमसुद्धा स्थापन करण्यात येईल, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
हेही वाचा - चिट फंड घोटाळा प्रकरणी राजीव कुमार यांच्या अडचणींत वाढ
पोलंडमधील व्यवसायिक संधीच्या अनुषंगाने येथून लवकरच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ पोलंडला पाठवण्यात येईल असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. युरोपीयन समुदायात पोलंड हा भारतात मोठी गुंतवणूक करणारा एक देश आहे असे सांगून पोलंडचे राजदूत डम बुरॉकोस्की म्हणाले, पोलंड आणि भारताचा जीडीपी सारखाच असून या ठिकाणी गुंतवणूक केल्यास आम्हाला समाधान मिळेल.
हेही वाचा - कंडेल सत्याग्रहासाठी महात्मा गांधींचा छत्तीसगड दौरा, ब्रिटीश सरकारची उडाली घाबरगुंडी