ETV Bharat / state

जनतेने मनात आणले तर कोणीही 'परमनन्ट' नाही; मुख्यमंत्र्यांचा मुश्रीफांना अप्रत्यक्ष टोला - हसन मुश्रीफ

विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री आज कागलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:14 PM IST

Updated : Jun 13, 2019, 8:07 PM IST

कोल्हापूर - म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कागल मतदारसंघातून आज प्रत्यक्षपणे विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. घाटगे यांचे वडील विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी समरजीत यांनी आज कागलमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कार्यक्रमाच्या निमित्ताने कागल मार्गावर समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक उभे केले होते. याच फलकांच्या मध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा परमनंन्ट आमदार अशा आशयाचे फलक उभे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या फलकावरून मुश्रीफ यांच्यावर चांगलीच टीका केली. जनतेने एकदा मनात आणले तर कोणीही परमनन्ट होऊ शकत नाही. जो जनतेची दिशाभूल करतो त्याला जनता घरी बसल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दात त्यांनी मुश्रीफांवर निशाणा साधला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे समरजीत घाटगे युतीचे उमेदवार असल्याचे घोषित केले.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर कागल तालुक्यामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कागल तालुक्याला राजकारणाचे विद्यापीठ म्हटले जाते. राजकारणाच्या याच विद्यापीठात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टिकेनंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा कोल्हापुरात रंगताना दिसत आहे.

Intro:अँकर : म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कागल मतदारसंघातून आज प्रत्यक्षपणे विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. घाटगे यांचे वडील विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी समरजीत यांनी आज कागलमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागल मार्गावर समरजीत घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक उभा केले होते. याच फलकांच्या मध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा परमनंट आमदार अशा आशयाचे फलक उभा करून मुख्यमंत्र्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनीही या फलकावरून आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलीच टीका केली. जनतेने एकदा मनात आणले तर कोणीही परमनंट होऊ शकत नाही. जो जनतेची दिशाभूल करतो त्याला जनता घरी बसल्याशिवाय राहत नाही. अशा शब्दात मुश्रीफ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले. यावेळी पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा यांनी अप्रत्यक्षपणे समरजीत घाटगे युतीचे उमेदवार असल्याचं घोषित केले. दरम्यान, लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर इकडे कागल तालुक्यामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तयार झालंय. खरंतर कागल तालुक्याला राजकारणाचं विद्यापीठ म्हंटल जातंय. राजकारणाच्या याच विद्यापीठात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टिकेनंतर कागल मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलतील शंका नाही.

बाईट : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीBody:.Conclusion:.
Last Updated : Jun 13, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.