ETV Bharat / state

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आकस ठेवणाऱ्या अधिकाऱ्याच्या छाताडावर उभे राहू - संजय पवार यांनी ठोकला शड्डू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या गोपनीय बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्याने वादग्रस्त विधान केलं होतं. याविषयी आज मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला.

ठाकरे गट, जिल्हाप्रमुख संजय पवार
ठाकरे गट, जिल्हाप्रमुख संजय पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 3:00 PM IST

Updated : Aug 23, 2023, 3:05 PM IST

जिल्हाधिकारी आणि मराठा समाज प्रतिनिधींमध्ये खडाजंगी

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्टला मराठा आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीदरम्यान झालेल्या एका गोपनीय बैठकीत एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं तर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याची सोशल मीडिया पोस्ट मराठा वनवास यात्रेचे प्रमुख योगेश केदार यांनी प्रसारित केली होती. तसेच याबाबत वृत्तपत्रांमधून बातमी प्रसारित झाल्यानंतर आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

संजय पवारांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्टच्या दिवशी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक का घेतली गेली असा सवाल शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मराठा समाजाबद्दल जर कोणी अधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्या अधिकाऱ्याला कोल्हापुरातील रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

मराठा समाजाचे पदाधिकारी आक्रमक : 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यभरातील मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मराठा कार्यकर्त्यांचा काहीसा वाद झाला होता. यामुळे बैठकीत काहीकाळ गोंधळ झाला. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्धही झाल्या. याच पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीत (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाजाची गुप्त बैठक का घेतली, असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेल्या गुप्त बैठकीतील तपशील सांगण्याचा अधिकार मला नाही. मात्र या खुलाशानंतरही मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. वृत्तपत्रातूनच याबाबत खुलासा व्हावा, असा पवित्रा घेत सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले. मराठा समाजाबद्दल आकस ठेवून एक प्रशासकीय अधिकारी, असं बोलणार असेल तर त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही. त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर उभे राहू, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास उमेदवारांना नोकरीची संधी नाकारली, उच्च न्यायालयात याचिका दाखल
  2. Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री अलर्ट मोडवर; मराठा समन्वय समितीच्या नेत्यांची व मंत्र्यांची बोलावली बैठक

Last Updated : Aug 23, 2023, 3:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.