कोल्हापूर - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तीन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी 'पूरग्रस्त भागात योजना राबवताना अडचण येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणुका 6 महिने पुढे ढकलाव्यात' अशी मागणी केली आहे.
आज (17 ऑगस्ट) देसाई यांनी गडहिंग्लज तालुक्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ते पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. निवडणुका आत्ता घेतल्यास पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. यावेळी, भुमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना साड्या तसेच ब्लँकेटचे वाटपदेखील करण्यात आले.