कोल्हापूर : कोल्हापूरातील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची व्याप्ती इथे आल्यावर मला समजली आहे. राज्यातच नाही तर जगभरात जागृती निर्माण करणारा लोकोत्सव होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाय या लोकोत्सवात सहभागी होणारा प्रत्येकजण काही ना काही ज्ञान घेऊन जाणारच असल्याचेही त्यांनी म्हंटले. सेंद्रिय शेतीवर सुद्धा शेतकऱ्यांनी भर दिली पाहिजे त्याने उत्पादन कमी होते हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हंटले. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या ठिकाणी आज भेट देऊन महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कार्यक्रम जागतिक पातळीवर जाईल : या महोत्सवाची व्याप्ती इथे आल्यावर मला समजली आहे. राज्यातच नाही तर जगभरात जागृती निर्माण करणारा लोकोत्सव होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा कार्यक्रम जागतिक पातळीवर जाईल असेही ते म्हणाले. आजकाल आपण पृथ्वीवर ज्या आपत्तीजनक परिस्थितिला सामोरे जात आहे. पृथ्वीवर मोठे संकट असल्याचे आपल्याला दिसतंय. त्याची कारणे आपल्याला इथे आल्यावर समजतील. त्यानुसार सर्वांनी जी काळजी घ्यायची आहे हे सुद्धा समजणार आहे. जगभरात व्याधी आणि रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याचा समतोल राखण्यासाठी तसेच मोठा धोका टाळण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लोकोत्सवात जैविक शेती संकल्पना : यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या लोकोत्सवात जैविक शेती सुद्धा संकल्पना मांडली आहे. लोकांना वाटतंय शेंद्रिय शेतीतून उत्पन्न कमी मिळेल पण इथे उलटे आहे. आत्मनिर्भर भारत प्रमाणे आत्मनिर्भर गाव सुद्धा इथे सुरू आहे. वैज्ञानिकांनी सुद्धा इथे येऊन पाहिणी करावी आणि इतरांना सुद्धा माहिती द्यावी. त्यामुळे आपला समज बदलून जाईल, प्रत्येकाने या लोकोत्सवाला भेट दिली पाहिजे. इथे येणारा प्रत्येकजण काही ना काही घेऊन जाईल. सरकारने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे, जी मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहे. असेही ते म्हणाले.
पत्रकार वारीशे प्रकरणी पाठीशी घालणार नाही : यावेळी पत्रकार वारीशे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पत्रकार वारीशे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही. आरोपीला अटक केले आहे, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कायद्यानुसार शिक्षा ही होणारच असेही ते म्हणाले.
हेही वाचा - Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; आता सुरू केले अन्नत्याग आंदोलन