कोल्हापूर - छत्रपती संभाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक दिन सोहळा आज(गुरुवार) कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळागडावर उत्साहात पार पडला. यावेळी 'छत्रपती संभाजी महाराज की जय' या घोषणांनी परिसर दुमदूमला होता.
छत्रपती संभाजी महाराज यांचे जास्त काळ वास्तव्य असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळागडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट आणि पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. महाराणी ताराराणी यांच्या वाड्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासमोर गडपूजन आणि पालखीपूजन करण्यात आले.
हेही वाचा - राऊत यांचा भाजपकडून निषेध; हाळवणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मात्र 'नो कमेंट्स'
सात नदीच्या पाण्याने मुलींच्या हस्ते छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेवच्या जयघोषणांनी गड दुमदुमून गेला होता. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक आणि पारंपरिक वेषभूषा या मिरवणूक लक्षवेधी ठरली. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी हजेरी लावली होती.
हेही वाचा - मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना योग्य, माजी आमदार हाळवणकर वक्तव्यावर ठाम