ETV Bharat / state

'भाजपने संभाजीराजेंना मोठा सन्मान दिला मात्र ते सांगत नाहीत' - chandrakant patil news

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महाराष्ट्र दौरा सुरू केला असून उद्या (दि. 28 मे) ते आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, भाजपने संभाजीराजेंना आजपर्यंत मोठा सन्मान दिला आहे. मात्र, संभाजीराजे ते सांगत नाहीयेत, असे चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. 27 मे) म्हणाले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : May 27, 2021, 3:31 PM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महाराष्ट्र दौरा सुरू केला असून उद्या (दि. 28 मे) ते आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, भाजपने संभाजीराजेंना आजपर्यंत मोठा सन्मान दिला आहे. मात्र, संभाजीराजे ते सांगत नाहीयेत, असे चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. 27 मे) म्हणाले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

...म्हणून मोदींनी नाकारली भेट

संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदी यांना 4 वेळा भेट मागीतली पण ती नाकारली म्हणून सांगत आहेत. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संभाजीराजेंना यापूर्वी 40 वेळा भेट दिली आहे. मात्र, सध्या ज्यासाठी संभाजीराजे भेट मागत आहेत. तो विषयच मुळात राज्याचा आहे, त्यामुळे त्यावर त्यांनी भेट नाकारली आहे. सदिच्छा भेट घ्यायची असती तर ती लगेच दिली असती, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

खासदार संभाजीराजे सन्मान दिल्याचे सांगत नाही

भाजपने संभाजीराजे यांना आजपर्यंत मोठा सन्मान दिला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहू महाराजांच्या वंशजांना आपण भाजपमधून नाही तर राष्ट्रपती कोट्यातून खासदार करू असेही म्हंटले होते, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. प्रत्येक ठिकाणी त्यांना सन्मान दिला आहे. मात्र, ते कुठेही सांगत नाहीत आणि कोणाला याबाबत कल्पना नाही, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, जे कोणी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत त्यांच्या पाठीशी भाजप आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेऊन पाठिंबा द्यायला तयार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज

सध्या कोरोनाचे संकट आहे कोणाचेही काहीही ऐकून आंदोलन करू नका, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी आज रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज असल्याचे म्हटले. शिवाय आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल, असेही पाटील म्हणाले. कोरोनाचे संकट आहे म्हणून शेती बंद करायची का, कारखाने बंद करायचे का, असे म्हणत जे कोणी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा - आता होम आयसोलेशन बंद, कोल्हापूरमध्ये काय आहे परिस्थिती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.