ETV Bharat / state

Chandrakant Patil PC In Kolhapur : 'मुस्लिमांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी' - चंद्रकांत पाटील मशीद भोंगे प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Speech In Thane ) यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात, ते भारतीय जनता पार्टी ( BJP ) खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Kolhapur Press Conference ) यांनी दिली आहे.

Chandrakant Patil Statement On Mosque Loudspeeker

author img

By

Published : Apr 13, 2022, 7:00 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Speech In Thane ) यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा असली तरी राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात, ते भारतीय जनता पार्टी ( BJP ) खूप आधीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Kolhapur Press Conference ) यांनी दिली आहे. मुस्लिमांनी मशिदीत जरूर प्रार्थना करावी, पण अजान मशिदीपुरतीच मर्यादित रहावी. हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांवर आक्रमण नाही, पण त्याच वेळी त्यांचे लांगूलचालनही नाही. कोणी मशिदीत जाणे अथवा नमाज ( Chandrakant Patil Statement On Mosque Loudspeeker ) पढण्याला विरोध नाही. पण एकाच्या धर्माचा आदर करताना दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. इतरांवर धर्म थोपविण्याची आवश्यकता नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

'ते भाजपाचेच मुद्दे' - चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरे हे हिंदुत्वाचे मुद्दे मांडत आहेत. परंतु, भारतीय जनता पार्टी आणि भाजपाचे कार्यकर्ते ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेतात, तो संघ हिंदुत्वाचे हे मुद्दे सुरुवातीपासून मांडत आहे. राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा हे मुद्दे भाजपा सुरुवातीपासून मांडत आहे. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

'म्हणून मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन' - शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरे भाजपाच्या हिंदुत्वाबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे नाही. तर सामान्य माणूस काय म्हणतो, हे महत्त्वाचे आहे. या देशातील हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपाने काय कार्य केले आहे, याची सामान्य लोकांना जाणीव आहे. शिवाय भाजपाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत युती करून सत्ता मिळविल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, काश्मीरमध्ये निवडणुका होऊ शकत नाहीत आणि लोकशाही प्रक्रिया चालू शकत नाही, असे वातावरण दहशतवाद्यांनी निर्माण केले असताना केंद्र सरकारने तेथे निवडणुका घेतल्या. निवडणुकीनंतर लोकशाही प्रक्रिया टिकविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तथापि, मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाची वाटचाल पाकिस्तानधार्जिणी असल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर भाजपा आघाडी सरकारमधून बाहेर पडली, असेही ते म्हणाले.

'देव मानावा किंवा न मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न' - काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली, तर शिवसेनेची आघाडी सरकारमधून बाहेर पडायची हिंमत का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नास्तिक असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आस्तिक असावे की नास्तिक असावे, अथवा देव मानावा किंवा न मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आपण त्याविषयी टिप्पणी करणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - Raj Thackeray : सभेत तलवार दाखवणे पडले महागात.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.