ETV Bharat / state

अरे... तुम्ही तर सत्तेसाठी महाशिवआघाडीतील 'शिव' काढला - भाजप

महाशिवआघाडीची महाविकास आघाडी कशी झाली ? कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही, असे पवार किंवा थोरातांनीच तुम्हाला सांगितले असेल. म्हणून 'शिव' हे नाव काढले असावे, असे बोलत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर घणाघात केला.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 14, 2020, 8:15 AM IST

कोल्हापूर - 'आजके शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून सर्वत्र वाद सुरू आहे. याबाबत कोल्हापूर येथे चंद्रकांत पाटलांनी आपली भुमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेने सत्तेसाठी महाशिवआघाडीचे नाव बदलुन महाविकास आघाडी केल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

चंद्रकांत पाटील यांची संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका...

साप म्हणून भुई बडवायचं थांबवा..

ज्या पुस्तकावरून सर्वत्र गदारोळ सुरू आहे, ते पुस्तक मुळात भाजपचे अधिकृत पुस्तक नाही. या पुस्तकाबद्दल काय म्हणायचंय ते म्हणा, पण भाजपसह मोदी आणि शहा यांच्यावर राग का काढताय? असा सवाल करत, चंद्रकांत पाटील यांनी साप म्हणून भुई बडवण्याचा प्रकार थांबवावा असे म्हटले आहे.

हेही वाचा... 'ही' सभ्यता नरेंद्र मोदी कधी शिकणार..काँग्रेसची 'त्या' लेखकाविरुद्ध पोलिसांत तक्रार

तेव्हा का बोलती बंद झाली होती ?

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाने छापलेल्या पुस्तकात, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का झाली होती? त्यावेळी त्यांनी कोणतेही ट्वीट का केले नाही? असे प्रश्न उपस्थीत करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे.

सत्तेसाठी शिवसेनेने महाशिवआघाडीतील 'शिव' शब्द काढला..

Intro:ज्या पुस्तकावरून सर्वत्र गदारोळ सुरू आहेत ते पुस्तक मुळात भाजपचे अधिकृत पुस्तक नाहीये. पुस्तकाबद्दल काय म्हणायचं ते म्हणा, पण भाजपसह मोदी आणि शहा यांच्यावर राग काय काढता असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. मध्यप्रदेशमध्ये सावरकर आणि गोडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी ट्वीट का केले नाही? तुम्ही महाशिवआघाडीतील शिव का काढले असे अनेक सवाल करत चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे. यावेळी बोलताना अनेतिकतेने स्थापन झालेले सरकार बघून बाळासाहेब सुद्धा स्वर्गात रडत असतील असे म्हणत हे सरकार आपोआपच पडणार असून आम्ही काहीही करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही काँग्रेसने आमच्या घरातल्या भावाला आमिष दाखवून चोरून नेल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.