कोल्हापूर - एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड झाले आहे. (Chandgad connection of MD drugs revealed) ड्रग्स प्रकरणी कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावातील एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास 4 किलो ड्रग्स जप्त केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी ड्रग्ससह एकाला ताब्यात घेतले आहे.
गेल्या 3 दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू असून 6 जणांची कसून चौकशी करण्यात आली. या ड्रग्जची कोट्यवधी रुपये किंमत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या 10 जणांच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे.
Chandgad MD Drugs Case : एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड; ढोलगरवाडीत ड्रग्ससह एकजण ताब्यात - एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड
चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत गुन्हे अन्वेषण शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मुंबई पोलिसांनी ड्रग्ससह एकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एमडी ड्रग्जचे चंदगड कनेक्शन उघड झाले आहे. (Chandgad connection of MD drugs revealed)