ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'कॅट शो'मध्ये अवतरल्या 400 हून अधिक प्रकारच्या 'मनी माऊ'

Cat Show in Kolhapur : माणुसकीचे शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यातच घरातील प्रत्येक सदस्याची लाडकी असलेल्या मनीमाऊला दिवसभरातील व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून अंगा-खांद्यावर खेळवून कोल्हापुरात मांजर प्रेम जोपासलं जातं. यातच गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा कोल्हापुरात कॅट शोचं आयोजन करण्यात येत आहे. या कॅट शोमध्ये 400 हून अधिक देशी आणि विदेशी मांजराच्या प्रजाती पाहायला मिळत असल्यानं कोल्हापूर आता कॅट शोचं नवं हब बनत आहे.

Cat Show
कॅट शो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 5:19 PM IST

कॅट शो

कोल्हापूर : Cat Show in Kolhapur देशभरातील मांजर प्रेमींमध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोची हैदराबाद अशा मेट्रो शहरांचा सहभाग दिसतो. यामध्ये मांजर प्रेमींकडून देश- विदेशातील मांजरांचं प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. विशेषत: लोक श्वान मोठ्या प्रमाणात पाळतात त्याचप्रमाणे आता मांजरीही घरात पाळली जातात. त्यांची स्वच्छता आणि त्यांच्या पालकांचे प्रबोधन याविषयी माहिती देण्यासाठी देशभरात कॅट शोचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. कोल्हापुरातही गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा कॅट शो आयोजित करण्यात आला असून फ्लाईंग क्लब ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं 2019 या वर्षात पहिल्यांदाच कोल्हापुरात कॅट शो झाला होता. यावेळी मांजर प्रेमी पालकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे देशभरातील मांजर प्रेमी ही अचंबित झाले होते. यामुळेच गेल्या पाच वर्षात कोल्हापुरात तीन वेळा कॅट शोचं आयोजन करण्यात आलं आणि याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रजातींची मांजरं आकर्षणाचा केंद्र : जगभरातील सर्वाधिक मांजरप्रेमींना आवडणारी पर्शियन कॅट, क्लासिक लाँग हेअर, बेंगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झॉटिक शॉर्ट कॅट, सैबेरियन कॅट, सियामिस, ओरीवो, भारतीय जातीचे इंडी माऊ, अशा विविध जातीची आणि बघणाऱ्याला हवीहवीशी वाटणारी ४०० हून अधिक मांजरे या प्रदर्शनात (कॅट शो) सहभागी झाली होती.

मांजरांच्या किंमती लाखांच्या घरात : मांजरांच्या किंमती 20 हजार ते 5 लाखापर्यंत असून आवडतं मांजर खरेदी करण्याकडे कोल्हापूरकरांचा कल पाहायला मिळतो. यासाठी लाखांची किंमत मोजायलाही मांजरप्रेमी कमी करत नाहीत. सध्या कोल्हापुरात थायलंड, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, सिंगापूर अमेरिकेहून मागवलेली मांजरं पाहायला मिळतात. त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था त्यांचे पालक करतात. मांजरांविषयी प्रेम वाढावं, त्यांची विशेष काळजी घेतली जावी, देशी-विदेशी मांजरांची निगा राखण्यासंदर्भात प्रबोधन व्हावं या उद्देशानं गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा कोल्हापुरात कॅट शो आयोजित करण्यात आला. मुंबईनंतर कोल्हापुरात या शोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस कोल्हापूरकरांचे मांजर प्रेम वाढत आहे हेच यातून स्पष्ट होतं.

हेही वाचा :

  1. आईला चुकवून पोहायला गेलेल्या भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, मिठी मारलेल्या अवस्थेतच दोघांचेही मृतदेह
  2. ललित पाटील प्रकरणात ससूनच्या डॉक्टरला अटक, रविंद्र धंगेकरांनी 'त्या' अधिकाऱ्याच्या फोन रेकॉर्डची चौकशीची केली मागणी
  3. कर्नाटकात लोकायुक्त अधिकार्‍यांचे 63 हून अधिक ठिकाणी छापे, कोट्यावधींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.