कोल्हापूर- कोरोना संदर्भात काही समाजकंटकडून खोडसाळपणे आणि जाणीवपूर्वक चुकीच्या पोस्ट, ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ व्हायरल केल्या जात आहेत. इचलकरंजी मधील आयजीएममध्ये सुविधांबाबत कोणताही गैरप्रकार घडला नसून, केवळ खोडसाळपणे ऑडिओ क्लिप करून व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. ऑडिओ क्लिप मधील रुग्णाने केलेल्या आरोपाबाबत कोणतेही तथ्य नाही आहे. आपत्ती कायद्यानुसार एकावर गुन्हा नोंद केला असल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील मुसळे येथील कोरोना सेंटरमधील रुग्णाचं मित्रासोबत बोलणं झालेली ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत माहिती देताना देशमुखांनी स्पष्टीकरण दिले. तसेच जाणीवपूर्वक असे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कोरोना सेंटरमध्ये करण्यात येत असलेल्या सुविधांचा उल्लेख केला आहे. मात्र काही आक्षेपार्ह विधाने देखील या संभाषणात मधून समोर आली आहेत. कुठलीही लक्षणं नसताना कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आणल्याचे देखील या संभाषणात म्हटले आहे.
कोरोना सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाने आपल्या मित्राला फोन करून आयजीएम रुग्णालयातील संदर्भात संवाद साधला आहे. आयजीएम रुग्णालयात दाखल झाल्यास सरसकट सगळ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे आक्षेपार्ह विधानदेखील यावेळी बोलताना केलं आहे. दीड लाखाचा निधी मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्ण दाखवण्यात येत असल्याचं वक्तव्यही करण्यात आलं आहे.