कोल्हापूर : प्रेम विवाहाला विरोध ( Opposed to love marriage ) केला म्हणून प्रियकराने प्रेयशीची गळा आवळला ( Boyfriend killed girlfriend ) नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ( Attempted suicide by consuming poison ) केल्याची घटना समोर आली आहे. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21 रा. खोतवाडी, इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर कैलास आनंदा पाटील (रा. लिंगनूर, ता. कागल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या संशयित आरोपीने प्रियशीची गळा आवळल्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
गळा आवळून खून - दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृत ऋतुजा चोपडे ही हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव येथे फार्मसी चे शिक्षण घेत आहे. शिक्षण सुरू असतानाच तिची संशयित आरोपी कैलास पाटील याच्याबरोबर ओळख झाली. ती आज कॉलेजला जाते म्हणून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती ऋतुजा कैलास सोबत गिरोली घाट येथे असलेल्या पांडव लेणी परिसरात फिरायला गेली. यावेळी दोघांमध्ये लग्नावरून वाद झाल्याचे प्राथमिक माहिती असून यानंतर प्रियकराने तिचा गळा वळून खून केला. त्यानंतर स्वतः कैलासने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार येथील स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, कैलास पाटील हा एका सिमेंट कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करतो. सकाळी त्याने मोबाईलवर गुड बाय असे, स्टेटस ठेवले होते त्यांनतर हा सगळा प्रकार आता समोर आला आहे.
Boyfriend Killed Girlfriend : प्रियकराने केली प्रेयशीची हत्या; विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न - Rituja Prakash Chopde
प्रियकराने प्रेयशीची गळा आवळून खून ( Boyfriend killed girlfriend ) केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. ऋतुजा प्रकाश चोपडे ( Rituja Prakash Chopde ) (वय 21 रा. खोतवाडी, इचलकरंजी) असे मृत तरुणीचे नाव आहे तर, कैलास आनंदा पाटील (रा. लिंगनूर, ता. कागल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने प्रेम विवाहाला विरोध ( Opposed to love marriage ) केला म्हणुन प्रियशीचा गळा आवळून खुन केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.