ETV Bharat / state

'वर्ष वायाच गेले; सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले हे तर कुचकामी सरकार' - वीजबिल माफ करण्यात सरकार अपयशी

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विविध मुद्यांवरून महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, महिला सुरक्षा या सर्व घोषणा हवेतच विरल्या असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला आहे.

bjp leader upadhye
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये
author img

By

Published : Nov 29, 2020, 3:49 PM IST

Updated : Nov 29, 2020, 4:51 PM IST

कोल्हापूर - महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा यासह कोरोना स्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदी उपस्थित होते.

बळीराजाच्या मदतीसाठी हे सरकार बहाणे शोधते -

यावेळी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असेही उपाध्ये यांनी म्हंटले.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकार परिषद
दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या - यावेळी उपाध्ये पुढे म्हणाले, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिरायत शेतीसाठी 25,000 आणि बागायती शेतीसाठी 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. फळबागांसाठी एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो, याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत, असल्याची टीकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली. वीजबिल माफ करण्याचे आश्वासन पाळले नाही - हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही. तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने 3 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले. सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठविली गेली आहेत. वीज बिल माफ करण्याचे आश्वासनही या सरकारने पाळले नाही. ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले - ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख , हालअपेष्टा जाणून घेऊ शकतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत आहेत. मात्र मुख्यमंत्री त्याबाबत चकार शब्दही उच्चारण्यास तयार नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही केशव उपाध्ये यांनी म्हंटले.

Last Updated : Nov 29, 2020, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.