ETV Bharat / state

Bison spotted in Kolhapur : कोल्हापूर शहरात आलेल्या 'त्या' गव्याला मूळ अधीवासाकडे पाठवण्यात यश

कोल्हापूरमधील ( Bison spotted near Kolhapur ) पंचगंगा नदीच्या घाट परिसरात मानवी वस्तीत आलेल्या जंगलातील गव्याला पाहण्यासाठी शहरातील नागरिक मोठी गर्दी केली होती. तब्बल 10 तासाच्या प्रयत्नानंतर त्या गव्याला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वन विभागाच्या जवानांनी त्याच्या मूळ अधीवासाकडे पाठवले.

गवा
Bison spotted in Kolhapur
author img

By

Published : Dec 11, 2021, 12:59 PM IST

कोल्हापूर - शहरात गेल्या 2 दिवसापासून गव्याचे ( Bison spotted near Kolhapur ) दर्शन होत होते. काल दिवभर पंचगंगा घाट परिसरात गवा होता. या परिसरातील जामदार क्लब जवळील भागात गवा दिसताच नागरिकांनी गर्दी ( CROWDS OF CITIZENS TO SEE BISON ) केली होती. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी गव्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु तो एका शेतातील मंदिराच्या बाजूला झाडाझुडपात जाऊन बसला. याची माहिती मिळताच वनविभाग,अग्निशामक दल आणि आपती व्यवस्थापन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तब्बल 10 तासाच्या प्रयत्नानंतर त्या गव्याला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वन विभागाच्या जवानांनी त्याच्या मूळ अधीवासाकडे पाठवले. तर तो गवा शिंगणापूरच्या दिशेने निघून गेला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रात्री उशिरा हा गवा कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग पुल क्रॉस करून वडणगे निगवेकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळाला.

वन विभागाच्या जवानांनी गव्याला मूळ अधीवासाकडे पाठवले.

गवा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी -

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या घाट परिसरात मानवी वस्तीत आलेल्या जंगलातील गव्याला पाहण्यासाठी शहरातील नागरिक मोठी गर्दी केली होती तर काही नागरिकांचे मोबाईलमध्ये फोटो-व्हिडिओ काढणं चालू केले. यामुळे घाबरलेला गवा बाहेर येण्याची हिम्मतच करत नव्हता. यामुळे वन विभागला देखील अपयश येत होते. पोलिसांच्या मदतीने अनेकदा नागरिकांना तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. अनेक जण गेली पण जाता जाता परत आली. जसे काय येथे कधी न बघितलेला प्राणी आला आहे आणि तो पाहायचाच आहे, अशी येथील नागरिकांची मानसिकता होती. मात्र सकाळ पासून चालू असलेल्या या घटनेनंतर संध्याकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या गव्याला त्याच्या घरात सोडण्यात यश आले. परंतु येथे देखील अनेक नागरिक वन विभागाच्या पुढे-पुढे जाऊन गर्दी करत होते.

जंगलातील प्राणी शहराकडे का वळत आहेत -

गेल्या काही वर्षात जंगलाच्या बाजूला शेती करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशातच डिसेंबर महिन्यात जंगलातील पान स्थळ अटायला सुरुवात होतात. त्यामुळे खाद्याच्या आणि पाण्याच्या शोधात प्राणी शहराकडे वळत आहेत. अलीकडच्या काळात शेतकरी उसाची लागवड सुद्धा जास्त करत आहे. तर गवा हा काही जातीचे ऊस देखील आवडीने खातो. यामुळे वन्यजीव शहराकडे येण्याचे प्रमाण वाढल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगत आहेत.

गवा शहरी भागात आलाच तर काय करावे -

गवा शहरी भागात आलाच तर घाबरून न जाता वन विभागाशी संपर्क करून माहिती कळवावी. लोकांची गर्दी गोंगाट होऊ नये, ही काळजी घ्यावी. कारण, गवा हा दिसायला मोठा प्राणी असला तरी भित्रा प्राणी आहे. त्याच्यामागे काट्या घेऊन लागला तर तो भिऊन धावपळ करेल त्याच्या वजनामुळे गवा थकेल आणि त्याला हार्टअटॅक येईल. त्याला विश्रांती द्यावी आणि शक्य असेल तेवढं एकट सोडावं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.