ETV Bharat / state

पेट्रोल पंपावर मोटारसायकलीने घेतला पेट; आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला - FIRE

पेट्रोलचा ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पेट्रोल सांडले होते. मोटारसायकल सुरू करत असताना अचानकपणे या गाडीचा प्लग शॉर्ट झाल्याने मोटारसायकलने अचानक पेट घेतला.

कोल्हापूर
author img

By

Published : Jun 15, 2019, 12:59 PM IST

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील टोपमधील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकल पेटल्याची घटना घडली. पेट्रोलचा ओव्हरफ्लो होऊन त्याचवेळी प्लग शॉर्ट झाल्याने गाडी पेटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील उपस्थितांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत मोटारसायकल जळून खाक झाली आहे. सुनील पवार यांची ही मोटारसायकल असून गाडी जळतानाचा व्हिडिओ कैमेऱयात कैद झाला आहे.

पेट्रोल पंपावर मोटारसायकलीने घेतला पेट; आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतीमाल प्रक्रिया संघाचा पेट्रोल पंप आहे. यावेळी पानपट्टी दुकानासमोर येथील टोप गावातील सुनिल पवार आपली मोटारसायकल स्टार्टरने सुरू करत होते. त्यातच पेट्रोलचा ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पेट्रोल सांडले होते. मोटारसायकल सुरू करत असताना अचानकपणे या गाडीचा प्लग शॉर्ट झाल्याने मोटारसायकलने अचानक पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपावरील आपत्कालीन अग्निशमन यंत्र तसेच पाणी ओतून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

आग वेळीच आटोक्यात आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्यथा काही अंतरावरच पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ घडला असता.

Intro:अँकर : कोल्हापूरमधील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकल पेटल्याची घटना घडली. हातकणंगले तालुक्यातील टोप मध्ये ही घटना घडली. मोटारसायकल ओव्हर फ्लो होऊन त्याचवेळी प्लग शॉर्ट झाल्याने गाडी पेटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील उपस्थितांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मोटारसायकल जळून खाक झाली आहे. येथील सुनील पवार यांची ही मोटारसायकल असून हे जळीत कांड कॅमेरामध्ये कैद झाले आहे. Body:व्हीओ : येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शेतीमाल प्रक्रिया संघाचा पेट्रोल पंप आहे. यावेळी पानपट्टी दुकानासमोर येथील टोप गावातील सुनिल पोवार आपली मोटारसायकल स्टार्टरने सुरु करीत होते. त्यातच पेट्रोलचा ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून पेट्रोल सांडले होते. मोटारसायकल सुरु करीत असताना अचानकपणे या गाडीचा प्लग शॉर्ट झाल्याने मोटारसायकलने अचानक मोठा पेट घेतला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरीकांनी प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपावरील आपत्कालीन अग्निशमन यंत्र तसेच पाणी ओतून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. अन्यथा काही अंतरावरच पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ घडला असता. Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.