ETV Bharat / state

Bhaskar Jadhav On BJP : भास्कर जाधवांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, फक्त ईडी, सीबीआय...

Bhaskar Jadhav On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर कोल्हापुरात चांगलाच हल्लाबोल केला. भाजपासोबत आता कोणताही राजकीय पक्ष नसून ईडी, सीबीआय आणि आयकर विभागचं भाजपाचे सोबती असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav On BJP
आमदार भास्कर जाधव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 7:42 AM IST

कोल्हापूर Bhaskar Jadhav On BJP : भारतीय जनता पक्षानं सत्तेचा गैरवापर करत केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन देशभरातील प्रादेशिक पक्ष फोडण्याचं काम केल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. भाजपासोबत आता कोणताही पक्ष नसून त्यांच्यासोबत फक्त सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर जाधव हे सोमवारी बोलत होते.

राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार येणार नाही : भाजपानं 2014 ला काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्याचा भास निर्माण केल्याचं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं. निवडणुका या जुमला असतात, हे भाजपानं सिद्ध केलं. भाजपानं दिलेली आश्वासन सगळी खोटी होती. अशा पद्धतीनं सत्ता हस्तगत केल्यानंतर आता पुन्हा देशातील जनतेकडं भाजपा कोणत्या हक्कानं मतं मागणार आहे, असा सवालही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. 2024 च्या निवडणुकीत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येणार नाही. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं राज्यभरात 'होऊ दे चर्चा' हा कार्यक्रम घेण्यात येत असल्याचंही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.

जनता योग्यवेळी कार्यक्रम करेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलै 2023 रोजी फूट पाडून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांचा शपथविधी झाला. हे फुटून गेलेले लोक कोणती विचारधारा जपणार आहेत? दोन महिन्यात अजित पवारांना पंतप्रधान मोदींचा विकास दिसला का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. जनतेला खुळं समजू नका, जनता सब जनती है, योग्यवेळी फुटून गेलेल्यांचा जनता नक्की कार्यक्रम करेल, असं आमदार भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

सदा सरवणकरांना आताच कसं सूचलं? : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी कोल्हापुरात केलं होतं. याबाबत भास्कर जाधव यांना विचारलं असता, आमदार भास्कर जाधव यांनी सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. सदा सरवणकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मांडीवर बसावं लागेल, म्हणून असे बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. उद्धव ठाकरेंवर आरोप करायला सदा सरवणकरांना आताच कसं सूचलं ? असा प्रश्नही आमदार जाधव यांनी उपस्थित केला.

भाजपाला कोकणच्या विकासाशी देणंघेणं नाही : 'मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दयनीय बनली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना हाल सहन करावे लागणार आहेत. यासाठी मी ही कुठेतरी जबाबदार आहे, भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात हा महामार्ग होणं अपेक्षित होतं. मात्र भाजपाला कोकणच्या विकासाशी काहीही देणंघेणं नाही. फक्त मतांसाठी विकासकामांचं गाजर दाखवलं जात आहे' असंही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे वेस्ट इंडिजचा खेळाडू : उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकोंबडा अशी टीका केली होती. याबाबत भास्कर जाधव यांना याबाबत विचारलं असता, चंद्रशेखर बावनकुळे हे वेस्टइंडीजचा क्रिकेटपटू अँब्रोज सारखे दिसतात, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला.

हेही वाचा :

  1. Bhaskar Jadhav : तिकडे तर भाजप अन् राष्ट्रवादी एकत्र! आता शिंदे गटाने तत्वनिष्ठ हिंदुत्व जगाला दाखवावे -जाधव
  2. Bhaskar Jadhav on BJP : भाजप कोणाचा पक्ष? भास्कर जाधवांनी थेटच सांगितले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.