ETV Bharat / state

कसबा बीड गावात सापडले बहामनी कालीन नाणे, १४६३ ते १४८२ काळातील नाणे असण्याची शक्यता - तुळशी नदी किनारी शेत

कोल्हापूरमध्ये इतिहासाची मोठी परंपरा आहे. त्यातच कसबा बीड गावात बहामनी कालीन १४६३ ते १४८२ काळातील नाणे सापडले आहे. एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात हे नाणे सापडले आहे.

बहामनी कालीन नाणे
बहामनी कालीन नाणे
author img

By

Published : Jun 30, 2023, 10:42 PM IST

कोल्हापूर: कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध होती असे बोलले जाते. कारण या गावात गावकऱ्यांना सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत. तसेच अजुनही या गोष्टी सापडत आहेत. याशिवाय येथे इतरही अनेक प्रकारची नाणी सातत्याने सापडत असतात. अशातच आता येथील एका ग्रामस्थाला बहामनी नाणे सापडले असून हे नाणे १४६३ ते १४८२ या काळातील आहे.

बहामनी कालीन नाणे सापडले - कसबा बीड येथील राहणारे ग्रामस्थ अमोल बाळासो तिबीले यांची तुळशी घाट परिसरात शेती आहे. या शेतात काम करत असताना त्यांना एक बहमनी कालीन नाणे सापडले असून सदर नाणे १.७ सेमीचा आहे. तर याचे वजन ७.५ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट असे फारसी अक्षरांचे अंकन केलेले दिसत असून हे नाणे बहमनी सुलतान शम्शुद्दीन मुहम्मद शाह तिसरा यांच्या इसवी सन १४६३ ते १४८२ कारकीर्द मधील आहे.

प्राचीन वैभावाची जणू साक्ष - अमोल तिबीले यांचे तुळशी नदी किनारी शेत आहे. येथे यापूर्वी सोन्याच्या बेडा, सोन्याचा नाग यासह बहामनी कालीन नाणी, इंग्रज कालीन नाणी सापडली आहेत. कसबा बीड-महे दरम्यानचा पूल बांधण्याआधी या शेतातून आरे गावाला जाणारी वाट होती. येथे आढळणारी ही नाणी पाहता ही वाट शिलाहार कालीन असून तिचा वापर इंग्रज काळापर्यंत होत असावा असे वाटते. गावात सापडणारी ही नाणी कसबा बीडच्या प्राचीन वैभावाची जणू साक्ष देत आहेत.

सोन्याचा पाऊस पडणारे गाव - गावामध्ये अनेकांना यापूर्वी सोन्याची नाणी सापडली आहेत. त्यामुळे सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशीही एक वेगळी ओळख आहे. याच गावात २०२० साली येथील यंग ब्रिगेड च्या तरुणांना उत्खनन करत असताना गावातील राजाराम वरुटे यांच्या शेतामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक वीरगळ आणि शिलालेख सापडले होते. शिवाय काही पुरातन वास्तूचे सुटे भाग सुद्धा आढळले होते. तर आता हे नाणे आढळल्याने पुरातत्व विभागाने सुद्धा लक्ष घालून या प्राचीन अवशेषांचे जतन करून आणखी संशोधन होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.