ETV Bharat / state

रिक्षाचालकाची मुलगी बनली एक दिवसाची स्थायी समिती सभापती

सभापती कवाळे यांनी आपल्या कार्यालयातच सकाळी योगिताला सभापतींच्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. त्यानंतर आयोजित स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा योगिताला घेऊन गेले. समितीच्या बैठकीत तिला अध्यक्षस्थानी बसविण्यात आले. एवढेच नाही तर बैठकीत तिने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रश्न आणि माहितीही विचारली.

autorikshaw driver daughter
रिक्षाचालकाची मुलगी बनली एक दिवसाची स्थायी समिती सभापती
author img

By

Published : Mar 7, 2020, 2:05 PM IST

Updated : Mar 7, 2020, 3:22 PM IST

कोल्हापूर - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सातवीत शिकणाऱ्या रिक्षाचालकाच्या मुलीला एक दिवसाची स्थायी समिती सभापती बनण्याची संधी मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. योगिता राजेंद्र शिंदे, असे या मुलीचे नाव आहे.

रिक्षाचालकाची मुलगी बनली एक दिवसाची स्थायी समिती सभापती

सभापती कवाळे यांनी आपल्या कार्यालयातच सकाळी योगीताला सभापतींच्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. त्यानंतर आयोजित स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा योगिताला घेऊन गेले. समितीच्या बैठकीत तिला अध्यक्षस्थानी बसविण्यात आले. एवढेच नाही तर बैठकीत तिने नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रश्न आणि माहिती सुद्धा विचारली. या अनोख्या उपक्रमामुळे योगिता ज्या शाळेत शिकते त्या जरगनगर विद्यामंदिरमधल्या शिक्षकांनाही तिचा अभिमान वाटत होता.

दरम्यान, योगिताने जागतिक महिला दिनानिमित्त काय नियोजन करण्यात आले आहे, असा प्रश्न विचारताच दिवसभर पार पडणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. दरम्यान, कवाळे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Last Updated : Mar 7, 2020, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.