ETV Bharat / state

Panchganga River: पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ

पंचगंगा नदीचे पाणी वाढत असल्याने नदी काठची शेती पाण्याखाली जात आहे. इतकेच न्हवे तर नदी काठच्या स्मशानभूमीला देखील याचा फटका बसत आहे. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावच्या स्मशानभूमी परिसरात पंचगंगा नदीचे पाणी आले आहे, त्यामुळे गावातील ग्रामस्थांना रस्त्यावरच अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ

author img

By

Published : Jul 17, 2022, 3:23 PM IST

कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रोज नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावच्या स्मशानभूमी परिसरात पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना रस्त्यावरच अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. ( The Water Level Of Panchganga River Increased ) त्यामुळे शासनाने पुराचा फटका बसणाऱ्या स्मशानभूमीचे योग्य जाग्यावर स्थलांतर करावे किंवा दुसरी सुविध उपलब्ध करून द्यावी अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ

अंत्यसंस्कार रस्त्याच्याबाजूला करण्याची वेळ - गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. (2005 2019) आणि (2021)ला तर महापुराचे पाणी शहरात आल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. यावर्षीही तिच परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमिवर नागरिक त्रस्थ आहेत. गेल्या काही वर्षात नदीचे पाणी वाढले की पाणी स्मशानभूमीत शिरल्याने येथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत अशी परिस्थिती आहे.

पर्यायी स्मशानभूमी उभाराव्यात - यावर्षी ही कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश पाऊस होत असल्याने नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आणि नदीचे पाणी स्मशानभूमीत शिरले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाडच्या नागरिकांना अंतिमसंस्कार रस्त्याच्या कडेला करण्याची वेळ आली आहे. दरवर्षी पाणीपातळीत वाढ झाली की स्मशानभूमी पाण्याखाली जाते, यामुळे आमच्यावर रस्त्याचा कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते म्हणून शासनाने जिथे जिथे स्मशानभूमी पाण्याखाली जाते तिथे पर्यायी स्मशानभूमी उभाराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा - PROFILE OF DHANKHAD:शेतकरी कुटुंबात जन्मलेले धनखड ममता सोबतच्या संघर्षामुळे होते चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.