कराड (सातारा) - कोयना धरणाची पाणी पातळी आज सकाळी 8 वाजता 2161 फूट 11 इंच झाली असून, पाणीसाठा 103.19 टीएमसी इतका आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे.
2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक देखील कमी होत आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सकाळी 11 वाजता बंद करण्यात येणार आहेत. पायथा वीजगृहाद्वारे 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरूच राहील, असे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात येणार
कोयना धरणाची पाणी पातळी आज सकाळी 8 वाजता 2161 फूट 11 इंच झाली असून, पाणीसाठा 103.19 टीएमसी इतका आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात येणार आहेत. मात्र, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास पायथा विद्युतगृहाद्वारे सोडल्या जाणार्या विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.