कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या जवानाचा पंजाब येथे अपघाती मृत्यू झाला आहे. युद्धाचे प्रशिक्षण संपवून पंजाबकडे जात असताना भटिंडा शहराजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात जवान मनोज महादेव पाटील (वय 26) यांचा मृत्यू झाला. आज कोडोली येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मनोज पाटील तोफखाना युनिट 51 मध्ये चालक म्हणून काम करत होते. युद्धाचे प्रशिक्षण संपल्यानंतर ते इतर जवानांना घेऊन पंजाबकडे परत जात असताना भटिंडा शहराजवळच्या झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
2014 साली मनोज पाटील सैन्यात भरती झाले होते. दीड वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच संपूर्ण कोडोली आणि परिसरावर शोककळा पसरली.