कोल्हापूर : कोल्हापुरातील बालिंगा येथे भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बालिंगा येथे बस स्टॉपजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कत्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी 3 किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली आहे. चोरी झालेल्या सोन्याची किमत दोन कोटी आहे. दरम्यान दरोडेखोरांनी भरदिवसा गोळीबार करत दरोडा घातल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
असा पडला दरोडा : मूळचे राजस्थान येथील माळी कुटुंबीय बालिंगा येथे स्थायिक झाले आहे. या कुटुंबियांचे कात्यायनी ज्वेलर्सचे दुकान आहे, हे दुकान बस स्टॉपपासून जवळच आहे. गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. दुकानात शिरताच त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सर्व दागिने दोन पिशव्यांमध्ये भरण्यास सांगितले.
दुकान मालक आणि मेहुणा जखमी : रमेश माळी यांनी त्याला प्रतिकार केला मात्र एका दरोडेखोराने त्यांना मारहाण केली, त्याचवेळी एकाने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबार करत दरोडोखोरांनी दुकानातील कपाटांच्या काचाही फोडल्या. दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत रमेश माळी यांच्या पोटाला आणि पायाला गोळी लागली आहे. दागिन्यांची चोरी करुन बाहेर पडणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला रोखण्याचा प्रयत्न जितू माळी यांनी केला होता. मात्र दरोडेखोराने त्यांच्या डोक्यात काचेचा तुकडा मारला. डोक्याला मार लागल्याने तेही जखमी झाले.
दुकानाबाहेर हवेत गोळीबार : दरोडेखोरांनी दुकानातील सुमारे 40 ट्रे मधील 3 किलो दागिने आणि दीड लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. दोन दुचाकीवरून चौघे गगनबावड्याच्या दिशेने केल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. पळून जाण्यास यशस्वी झाला. दुकानाबाहेर असलेल्या नागरिकांना पिस्तुलाचा धाक दाखवत या दरोडेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला. दुचाकीवरुन जात असताना त्यांनी हवेत गोळीबार केला. दुकानात दरोडेखोर घुसल्यानंतर माळी यांचा मुलगा पियुष हा कोपऱ्यातील स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन लपून बसला होता. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतर तो खोलीतून बाहेर आला. तो लपून बसलेल्या स्ट्रॉंग रूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित आहे. घडलेल्या प्रकारामुळे दुकान मालकाचा मुलगा पियुष खूप घाबरला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा -