ETV Bharat / state

आले किती गेले किती, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरचंं - अनिल परब

अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. आगामी काळातही महानगरपालिकेवर भगवा असेल, पण तो भाजपाचा असेल. असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला अनिल परब यांनी जोरदार उत्तर दिले.

Transport Minister Anil Parab
परिवहन मंत्री अनिल परब
author img

By

Published : Nov 19, 2020, 11:32 AM IST

Updated : Nov 19, 2020, 11:44 AM IST

कोल्हापूर - किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरचं आहे. मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबईसोबत उभी राहिली आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की कोणाला साथ द्यायची, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

परिवहन मंत्री अनिल परब

भाजपाने ‘भाजाप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेवर टीका केली होती. आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपाच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र आगामी काळात महानगरपालिकेवर भगवा असेल, पण तो शिवसेनेचा नसेल. असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अनिल परब यांचे फडणवीसांना जोरदार उत्तर -

याला शिवसेना नेते अनिल परब यांनीसुद्धा जोरदार उत्तर दिले. खूप जण आले, खूप घोषणा केल्या. मात्र मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या वाईट प्रसंगात शिवसेना उभी राहिली आहे. कुणाची साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे ते स्पष्ट होईल.

काय म्हणाले होते फडणवीस?

महाविकास आघाडीसरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे. जो गरिबांकरता काम करतो, त्यांच्यापाठी लोक उभे राहतात. मागच्या पाच वर्षात अनेक अडकलेली काम मार्गी लावली आहेत. कोस्टल रोड तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. रो-रो सेवा सुरू केली. बीडीडी चाळ प्रकल्प सुरू केला. सरकार एलअँडएनटी कंपनीला मदत करायला तयार नाही. धारावीचा प्रश्न आम्ही सोडवला. मेट्रोचे मोठे नेटवर्क उभे केले. मात्र हे सरकार विश्वासघातकी असल्याची टीका फडणवीसांनी केली.

मेट्रोवरूनही फडणवीसांचा शिवसेनेला टोला -

मेट्रोवरूनही यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मेट्रो कारशेडसाठी समिती तयार केली होती. त्या समितीने हेच सांगितले की मेट्रो तयार होण्यासाठी खूप वेळ लागेल. तरी त्यांनी हा रिपोर्ट दाबून ठेवला. खासगी विकासकाने या जागेवर देखील दावा केला आहे. यापूर्वी या सरकारने लोकांचा पैसा वाया घालवला आहे. मुंबईच्या खाड्या कोणाच्या कार्यकाळात बुजल्या गेल्या आहेत. हे सरकार जनेतची दिशाभूल करत आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी मेट्रोला विरोध केला आहे. जनतेला मेट्रो आणि बुलेट ट्रेन हवी असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी या बैठकीत केला आहे.

वीज बिलाबाबत परब काय म्हणाले -

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. वीजबिल सवलतीमध्ये अभ्यास करून निर्णय घेतल्यास त्याचा किती जणांना याचा फायदा होतो. याचा अभ्यास करत होतो. येत्या काही दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अशी प्रतिक्रिया परब यांनी व्यक्त केली. विरोधकांचे काम आहे विरोध करायचे. आता त्यांना काही दुसरे काम नाही, असा टोला देखील परब यांनी लगावला.

काँग्रेसच्या 'या' नेत्यांच्या प्रतिक्रियेवर अनिल परब यांचे उत्तर-

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना निधीची कमतरता भासते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जास्त निधी मिळतो. पण काँग्रेसला निधी मिळण्यास अडचण होते. असे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले होते. त्यावर बोलताना अनिल परब म्हणाले, निधी वाटप करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. निधी वाटप हे बसून ठरवता येते. काहींना निधी कमी मिळतो काहीना जास्त मिळे, अशी प्रतिक्रिया परब यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- भाजप येणार, मुंबई घडवणार’: मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

हेही वाचा- जम्मू काश्मीर : नागोर्ता टोल प्लाझाजवळ चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा

Last Updated : Nov 19, 2020, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.