ETV Bharat / state

अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करावे - श्री पूजकांची मागणी

अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी श्री. अंबाबाई मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी कोल्हापुरातील पुजाऱ्यांनी केली आहे.

Ambabai temple
अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करावे - श्री पूजकांची मागणी
author img

By

Published : Jun 27, 2020, 11:02 AM IST

कोल्हापूर - गेल्या चार महिन्यापासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर परिणाम जाणवत आहे. अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक फटका बसला आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात भाविकांसाठी श्री. अंबाबाई मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी कोल्हापुरातील पुजाऱ्यांनी केली आहे.

अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुले करावे - श्री पूजकांची मागणी
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापुरातील श्री. अंबाबाईचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दररोज लाखो भाविक देवीचे दर्शन घेत होते. मात्र, कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्याच्या सीमा बंद असल्याने तसेच मंदिरे बंद असल्याने भाविक देखील मंदिराकडे येऊ शकले नाहीत. त्याचा परिणाम मंदिर परिसरातील लहानमोठ्या व्यवसायावर झाला आहे.

मंदिरावर अवलंबून असणारे जवळपास ५०० हून अधिक लहान मोठे व्यवसाय आहेत. हार, ओटी साहित्य, नारळ विक्रेते, फुल विक्रेते, प्रसाद यांसारखे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांचा रोजचा उदरनिर्वाह त्याचा व्यवसायावर चालतो. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून त्याला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीचा विचार करून अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी कोल्हापुरातील श्री पूजक मंडळाच्या वतीने मकरंद मुनींश्वर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.