ETV Bharat / state

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात रास्ता रोको; केंद्र सरकारविरोधात निदर्शने

राधानगरी तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रास्ता रोको करत तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहेत. तरीही अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सुद्धा यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे.

कोल्हापूर रास्ता रोको
कोल्हापूर रास्ता रोको
author img

By

Published : Sep 27, 2021, 5:34 PM IST

Updated : Sep 27, 2021, 5:41 PM IST

कोल्हापूर - संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज (सोमवारी) भारत बंद पुकारला आहे. या बंदला अनेक राजकीय पक्षांसोबत विविध संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. कोल्हापुरात सुद्धा ठिकठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला आहे. राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे मुख्य मार्गावर सुद्धा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत या बंदला पाठिंबा दिला. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र तरीही त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही. याच्याच निषेधार्थ रास्ता रोको करत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात रास्ता रोको

रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा

राधानगरी तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रास्ता रोको करत तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहेत. तरीही अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सुद्धा यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे.

'या' शहरातही झाले आंदोलने

  • मुंबई - केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधार कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली. या बंदला देशातील काही राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी) रास्ता रोको केला. मुंबईच्या विक्रोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर बिंदुमाधव चौकात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाच ते दहा मिनिटे हा रास्ता रोको करण्यात आला. काही वेळातच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर अंधेरीमध्ये पाच राजकीय पक्षाने एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सविस्त वाचा - मुंबईत कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादीकडून रास्ता रोको; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
  • जळगाव - केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. सविस्तर वाचा - जळगावात 'भारत बंद' संमिश्र प्रतिसाद; काँग्रेस-राष्ट्रवादीने सक्तीने केली दुकाने बंद

हेही वाचा - शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी

Last Updated : Sep 27, 2021, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.