कोल्हापूर Aaditya Thackeray On Shinde Government : उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 आमदार बाद होऊन अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केलाय. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की, महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल, असंही आदित्य यांनी सांगितलं.
'या' लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का : आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का, याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती. यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्यानं हा वाद मिटवणार का, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडणार असल्याची चर्चा आहे.
दोन राजकीय पक्ष आणि परिवार फोडून भाजपाने काय मिळवलं : केंद्र आणि राज्यातील सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाला काय मिळालं याचा त्यांनी विचार करावा? सत्तेसोबत गेलेल्या 40 आमदारांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत. मात्र ते सत्ता मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. हे कशासाठी असा प्रश्न पडायला हवा, लवकरच निवडणुकीत राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवेल, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा -