ETV Bharat / state

'मी खासदार होईल तेव्हा स्मृती काकी प्रचाराला येतील' - खासदार धैर्यशील माने

सप्टेंबर महिन्यात वाढदिवसाला या, असा संदेश खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदीश्री माने हीने खासदार स्मृती इराणींना दिला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 13, 2020, 11:28 AM IST

कोल्हापूर - 'स्मृती काकी बेस्ट कॅम्पेन मॅनेजर आहे. मी खासदार होईल, असे त्यांना सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मी कॅम्पेन मॅनेजर होईल. त्यानंतर मी त्यांना होकारही दिला', असे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदिश्री माने हिने सांगितले.

आदीश्री बोलताना प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची मुलगी आदीश्री माने संसदेमध्ये अनेक खासदारांना भेटल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी तिने अनेक खासदारांची भेट घेतली. स्मृती इराणींचीही तिने भेट घेतली होती. नुकतेच आदीश्रीने खासदार स्मृती इराणींना एक शुभेच्छा पत्र पाठवले होते. त्यामध्ये तिने त्यांना त्यांची आठवण काढत कोल्हापूरला येण्याचे सांगितले आहे. स्मृती इराणी यांनीही ते शुभेच्छापत्र त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

त्यानंतर तिच्याशी बातचीत केले असता, ती म्हणाली, मला स्मृती काकी खूप आवडतात. मी निवडणूक लढवणार म्हणल्यानंतर त्यांनी प्रचारासाठी येणार असल्याचे सांगितले. त्या बेस्ट कॅम्पेन मॅनेजर होतील आणि मला निवडून आणतील. यावरून तिला पक्षाबाबत विचारले असता, मला शिवसेनाच आवडत असल्याचे आदीश्रीने म्हणाली. तसेच सप्टेंबर महिन्यात वाढदिवसाला या, असा संदेशही तिने खासदार स्मृती इराणींना दिले.

हेही वाचा - ...म्हणून 'त्याने' पेटवून दिले कोल्हापुरातील पोलीस निरीक्षकांचे घर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.