कोल्हापूर : तुझ्यात जीव रंगला ( tujhyat jiv rangala ) फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा ( Bhinetri Kalyani Kurle Jadhav ) कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. कल्याणीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच 'प्रेमाची भाकरी' नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.
असा झाला मृत्यू : कोल्हापूर सांगली महामार्गावर हालोंडी जवळ डंपरच्या धडकेत एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. कल्याणी कुरळे जाधव असे या अभिनेत्री चे नाव असून तिने तुझ्यात जीव रंगला यासह अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली महामार्गावर तिने प्रेमाची भाकरी या नावाने हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष : कल्याणी कुरळे जाधव मूळची कोल्हापूरची असून माहेर हे राजारामपुरी आहे. तर ते सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास आहेत. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसापूर्वीच शेतकरी संघटने कडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.