कोल्हापूर- राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकल्यानंतर मुश्रीफ समर्थक मोठ्या प्रमाणावर घरासमोर जमले आहेत. मुश्रीफ आमचे देव आहेत, गोरगरिबांची कामं करतात, असे म्हणत समर्थकांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आज बुधवारी सकाळपासून या ठिकाणी आयकर खात्याने छापा टाकल्याने कागल मधील समर्थकांनी मुश्रेीफांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरुवात केली होती. तसेच या कारवाईदरम्यान बाहेर असणाऱ्या वयस्कर महिलांना आपले अश्रू अनावर झाले.