कोल्हापूर - रंगपंचमीला मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दिवसभरात जवळपास 266 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - जोतिबा मंदिराच्या शेवटच्या खेट्यावर कोरोनाचा परिणाम; मध्यरात्रीपासून मंदिर बंद
शुक्रवारी सकाळपासूनच तरुण मद्यपान करून गाड्यांचे सायलेंसर काढून कर्कश आवाज करत शहरातून गाड्या फिरवत होते. अशांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये जवळपास 10 दुचाकी जप्त करून संबंधित तरुणांना ताब्यात घेतले आहे. दिवसभरात जवळपास 50 हजार रुपयांचा दंड सुद्धा पोलिसांनी वसूल केला. कारवाई केलेल्या 266 जणांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या 133 आहे. तर, मद्यपान करून गाडी चालवनाऱ्यांची संख्या 48 आहे.