कोल्हापूर - पंपिंग मोटर घेऊन जाणारा डंपर उलटल्याची घटना शिंगणापूर येथे घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शिंगणापूर येथील पंपिंग हाऊस पाण्याखाली गेले होते. दरम्यान, त्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आकारमानाने मोठ्या असणाऱ्या पाच मोटर दोन वेगवेगळ्या डंपर मधून एमआयडीसी येथे घेऊन जात असताना यातील एका डंपरचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.