ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत गव्याची शिकार - bison hunt news Amboli

आंबोली कनकीची मान (तारेचा खांब) येथील झुडुपात गवा रेड्याचे अवशेष सापडले आहेत. शिकाऱ्यांनी गव्याला ठार मारून त्याचे मास लंपास केले आहे. अलिकडच्या दोन दिवसातील ही घटना असून शिकाऱ्यांनी गव्याचे शिर, कातडी आणि आतडे घटनास्थळीच टाकले.

bison hunted in Amboli
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत गव्याची शिकार
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:13 PM IST

सिंधुदुर्ग - आंबोली कनकीची मान (तारेचा खांब) येथील झुडुपात गवा रेड्याचे अवशेष सापडले आहेत. शिकाऱ्यांनी गव्याला ठार मारून त्याचे मास लंपास केले आहे. अलिकडच्या दोन दिवसातील ही घटना असून शिकाऱ्यांनी गव्याचे शिर, कातडी आणि आतडे घटनास्थळीच टाकले. त्यामुळे, दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीला आली. याप्रकरणाची माहिती वनखात्याला दिल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहाणी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत गव्याची शिकार

आंबोली बाजारवाडी येथील पार्थ भिसे, साल्विन गोन्साल्वीस, केदार जाधव हे तिघे दुपारच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी तारेच्या खांबाजवळच्या रस्त्यावरून जात होते. दरम्यान त्यांना झुडपातून कुजल्याची दुर्गंधी आली. त्यांनी त्या झुडुपाजवळ जाऊन पाहिले असता तेथे गवा रेड्याचे शिर, तर अन्य ठिकाणी गवारेड्याची कातडी, आतडी व शेपटी आढळली. तसेच, रक्त पडल्याचे दिसून आले. याबाबत तिघांनीही वनविभागाला माहिती दिली.

आंबोली वनपाल व्ही.डी. चाळके, वनरक्षक गोरख भिंगारदिवे, पी.डी. गडेकर, अमोल पटेकर, वनमजूर बाळा गावडे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. तसेच, वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन घटनेचा पंचनामा केला. गवा रेड्याच्या मानेच्या कातडीच्या भागाचे पोस्टमार्टम करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली यांना बोलावण्यात आले होते. याप्रकरणी अधिक तपास करून अज्ञाताविरुद्ध गवारेड्याची शिकार करून मास लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

गवारेड्याची शिकार करत फक्त मास घेऊन गेल्याने शिकारी सराईत असल्याचे बोलले जात आहे. गोवा अथवा कोल्हापूर येथील सराईत शिकाऱ्यांचे हे काम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, वनविभागाने जंगलात संशयास्पद फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.

हेही वाचा - राज्यात प्रथमच सिंधुदुर्गातील धामापूर तलावाला जागतिक सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.