कोल्हापूर - अखिल भारतीय संत साहित्य परिषदेच्या आठव्या साहित्य संमेलनाचा मान यावर्षी कोल्हापूरला मिळाला आहे. या संमेलनाची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीने झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे.
शनिवारी सकाळी भवानी मंडप येथून टाळ मृदुंगाच्या गजरात महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते ग्रंथ आणि अश्व पूजन झाले. यानंतर ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. लहान मुले, ज्येष्ठ वारकऱ्यांच्यासह महिला या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. झांज पथकाच्या ठेक्यावर मुलींनी लेझीम सादर केली.
हेही वाचा - 'फायदा कोणाला..? कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करा'
वारकरी महिलांसह महापौर लाटकर यांनीही फुगडीचा आनंद लुटला. संमेलनामध्ये राज्यातील वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, दिंडीकरी, फडकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार भाग घेणार आहेत. या दरम्यान चर्चासत्र, भजन, भारुड, कीर्तन हे कार्यक्रम पार पडणार आहेत. या संत साहित्य संमेलनाची सांगता समारोप सोमवारी 30 डिसेंबरला होणार आहे.