ETV Bharat / state

धक्कादायक..! 7 ते 8 कुटुंबांना टाकले वाळीत, सैन्यातील जवानाच्या कुटुंबाचाही समावेश, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

कोल्हापुरातल्या एका गावामध्ये 7 ते 8 कुटुंबांना ( Families outcast in rukdi village in kolhapur ) वाळीत टाकल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये आर्मीमध्ये असलेल्या जवानाच्या कुटुंबालासुद्धा ( Families left stranded in rukdi village ) वाळीत टाकण्यात आले आहे.

families outcast in rukdi village in kolhapur
कुटुंब वाळीत रूकडी गाव कोल्हापूर
author img

By

Published : May 30, 2022, 10:28 AM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातल्या एका गावामध्ये 7 ते 8 कुटुंबांना ( Families outcast in rukdi village in kolhapur ) वाळीत टाकल्याची घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये आर्मीमध्ये असलेल्या जवानाच्या कुटुंबालासुद्धा ( Families left stranded in rukdi village ) वाळीत टाकण्यात आले आहे. हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावामध्ये ही घटना घडली असून वाळीत टाकण्यात आल्याची माहिती स्वतः येथील लोकांनी दिली आहे. पोलिसांकडे सुद्धा याबाबत तक्रार देण्यात आली आहे. मात्र, त्यावर काहीही कारवाई होत नसल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.

वाळीत टाकण्यात आलेले धनगर बांधव

हेही वाचा - Sanjay Raut In Kolhapur : 'ताजमहल फोडण्यापेक्षा हिंमत असेल तर चीनच्या ताब्यात...'; संजय राऊतांचे भाजपला आव्हान

धनगर समाजाच्या लोकांमधील वाद - हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावाकडे सदन गाव म्हणून पाहिले जाते. खासदार धर्यशील माने यांचे हे मूळ गाव. त्यांच्याच गावामध्ये हा प्रकार घडला आहे. आजपर्यंत गावात सर्वच समाजाचे लोकं गुण्या गोविंदाने राहत आले आहेत. मात्र, रुकडी गावातील माळावर असणाऱ्या धनगर मळ्यातील गणेश गल्लीमधील आठ कुटुंबांना त्यांच्याच समाजातील अध्यक्ष काशिनाथ शिणगारे यांनी वाळीत टाकले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या कुटुंबाबरोबर कोणी बोलायचे नाही, देवळात यायचे नाही, शाळेमध्ये त्यांच्या मुला मुलींबरोबर बोलायचे नाही. जर कोणी बोलले तर त्यांना तीन ते पाच हजार रुपये दंडही केला जातो, अशी इथल्या नागरिकांनी तक्रार केली आहे. याबाबत पोलिसांकडे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.

जाचक जातपंचायतीमुळे कुटुंबे वाळीत - आमच्या धनगर समाजाचा म्होरक्या दमदाटी करून लोकांमध्ये दहशत माजवत असतो. त्याला विरोध केल्याने त्याने उलट आमच्यावरच जात पंचायतच्या माध्यमातून वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जाचक जातपंचायतीच्या अटीमुळे वाळीत टाकल्याने आम्हाला कोण न्याय देणार, असा सवाल येथील शिणगारे परिवाराने केला आहे. कुटुंबांमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर कोणी जायचे नाही, एखादी आनंदाची गोष्ट असली लग्न समारंभ असला तरी सुद्धा कोणी जायचे नाही, जर गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा फतवाच इथल्या अध्यक्षांनी काढला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, वाळीत टाकणाऱ्या या अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शिणगारे कुटुंबाकडून होऊ लागली आहे.

सैन्य दलातील जवानाच्या कुटुंबाला सुद्धा वाळीत टाकले - रूकडी गावातील गणेश नगर गल्लीमध्ये संपूर्ण धनगर समाज राहतो. याच धनगर समाजातील देवेंद्र शिणगारे हे सैन्यदलात कार्यरत आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून ते सैन्यात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याही कुटुंबाला या समाजकंटकांनी वाळीत टाकले आहे. याबाबत त्यांनी पोलिसांत तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. शिवाय म्होरक्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Funeral of Jawan : जवान प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विरपत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम ठेवत श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.