ETV Bharat / state

कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा; ६२ हजाराचा मुद्देमाल पळवला - कोल्हापूर

कोल्हापुरातील यशवंत सहकारी बँकेत पुन्हा दरोडा पडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

बंदुकीचा धाक दाखवून बँक लुटताना दरोडेखोर
author img

By

Published : May 31, 2019, 12:52 PM IST

Updated : May 31, 2019, 1:08 PM IST

कोल्हापूर - आपटेनगर भागातील यशवंत सहकारी बँकेवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतून ६२ हजारांची रोकड पळवली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेली घटना

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांना अपयश आले. पुन्हा दरोडेखोरांचा तपास सुरू आहे. दरम्यान याच बँकेच्या कळे येथील शाखेत २ महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. त्यावेळी कोट्यवधी रुपये चोरट्यानी लंपास केले होते. तसेच बाजाराभोगाव येथील शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे चोरट्यांचा टार्गेटवर वारंवार हीच बँक का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Intro:अँकर- शस्त्रांचा धाक दाखवून भरदिवसा बँक लुटण्याचा प्रकार गुरुवारी कोल्हापुरात घडलाय. अपटेनगर इथल्या यशवंत सहकारी बँकेत घुसलेल्या दोघा चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील 62 हजाराची रोखड लंपास केलीय. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांचा ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.Body:व्हीओ-- या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा मग काढण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांना अपयश आले.दरम्यान याच बँकेच्या कळे शाखेत दोन महिन्यांपूर्वी दरोडा टाकून कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला होता तर बाजाराभोगाव इथल्या शाखेमध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता त्यामुळे चोरट्यांचा टार्गेटवर वारंवार हीच बँक का याचे गौडबंगालाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.Conclusion:.
Last Updated : May 31, 2019, 1:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.